बोरियावासीयांची नक्षल्यांच्या त्रासातून झाली मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:04 AM2018-04-27T00:04:40+5:302018-04-27T00:04:40+5:30

भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले.

The release of the Boriyasis resulted from the treatment of naxalites | बोरियावासीयांची नक्षल्यांच्या त्रासातून झाली मुक्तता

बोरियावासीयांची नक्षल्यांच्या त्रासातून झाली मुक्तता

Next
ठळक मुद्दे३९ नक्षलवादी ठार झाल्यामुळे गावकरी आनंदी : जेवण व इतर बाबींसाठी दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले. यामुळे बोरियावासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून नक्षल्यांच्या खात्म्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असल्याचे दिसून येते.
भामरागड तालुक्यातील बोरिया हे गाव इंद्रावती नदीजवळ आहे. छत्तीसगड राज्य व गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे येणे-जाणे वर्षभर सुरू राहत होते. सभोवताल घनदाट जंगल असल्याने नक्षल्यांसाठी बोरिया हे गाव रेस्ट झोन बनले होते. याचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत होता. बºयाचवेळा बंदुकीच्या धाकावर जेवण मागितले जात होते. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासींना नक्षल्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागत होती. अनेकदा नक्षल्यांची संख्या ५० ते १०० च्या जवळपास असल्यास संबंधित नागरिकांच्या घरचे संपूर्ण एक महिन्याचे धान्य दोन ते तीन दिवसांतच संपत होते. एखाद्या नागरिकाने घरची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केल्यास बंदुकीचे टोक त्याच्या छातीवर ठेवले जात होते. गावात रस्ता व इतर सुविधा झाल्यास नक्षल्यांचे वास्तव्य अडचणीत येण्याची शक्यता असल्याने या गावात रस्ते व इतर सुविधा निर्माण होऊ नये, यासाठी नक्षली नेहमीच प्रयत्न करीत होते. परिणामी शासनाच्या योजना अजूनही या गावापर्यंत पोहोचल्या नसल्याचे वास्तव प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतर दिसून येते.
नक्षल्यांकडून होणारी मारझोड, हिंसक कृत्यांमध्ये गावातील नागरिकांना बळजबरीने भाग घ्यायला लावणे, गावात नाचगाणे करायला लावणे यामुळे गावातील नागरिक कायम दहशतीखाली जीवन जगत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. यातील सर्वच नक्षलवादी पेरमिली दलमचे होते व ते बोरिया गावातील नागरिकांचा स्वत:साठी गैरवापर करीत होते. पोलीस दलाने सुमारे ३९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याने या गावातील नक्षलवाद्यांचा वावर जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बोरिया गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते.
नक्षल्यांच्या विरोधामुळेच गावाचा विकास रखडला
भामरागड तालुक्यातील अनेक गावे जंगलात वसली आहेत. या गावांमध्ये प्रशासनाने प्रयत्न करून विविध योजना पोहोचविल्या आहेत. मात्र बोरिया हे गाव नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन बनले होते. आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू नये, यासाठी या गावात व गावाच्या जवळपास रस्ते निर्मितीस नक्षलवाद्यांचा नेहमीच विरोध राहिला होता.
२२ एप्रिल रोजी बहुतांश नक्षलवादी ठार झाल्याची माहिती कळताच गावातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या अमानुष कृत्याचा पाढा पोलिसांपुढे वाचला. या कारवाईमुळे या गावातील नक्षल्यांची दहशत संपणार आहे. त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत होईल.
शहीद पोलिसांच्या कुटुंबियांनी २२ व २३ एप्रिलच्या घटनेबाबत सी-६० पोलीस जवान व सीआरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे.

Web Title: The release of the Boriyasis resulted from the treatment of naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.