गडचिरोलीतील ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक टॉवर कोसळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:27 AM2017-12-12T11:27:48+5:302017-12-12T11:33:15+5:30

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा या तालुका मुख्यालयी ब्रिटिशकालीन राजवटीत बांधण्यात आलेल्या पर्जन्यमापक टॉवरची दुरवस्था झाली आहे.

Rain count tower of British Era is in bad condition in Gadchiroli | गडचिरोलीतील ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक टॉवर कोसळण्याच्या मार्गावर

गडचिरोलीतील ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक टॉवर कोसळण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष सिरोंचातील ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी

आनंद मांडवे ।
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा या तालुका मुख्यालयी ब्रिटिशकालीन राजवटीत बांधण्यात आलेल्या पर्जन्यमापक टॉवरची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडी बांधकाम असलेल्या या ऐतिहासिक वास्तूची निगा राखण्यात शासन व प्रशासनाला आत्मियता नसल्याने त्याची पडझड होत आहे. पुरातत्व विभागामार्फत या वास्तूचे नविनीकरण करून या ऐतिहासिक मूल्यांचे जतन करावे, अशी मागणी होत आहे.
हवामान खात्याचे कार्यालय उपराधानी नागपूर येथे असले तरी या खात्याचा कर्मचारी सिरोंचा येथे कार्यरत नाही. इंग्रजांच्या सत्ताकाळात या विभागातील हवामानाचा अंदाज व पर्जन्याचे मोजमाप करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती. स्वातंत्र्यानंरही बरीच वर्षे हे कार्य सुरू होते. १९८० पर्यंत स्थानिक महसूल विभागाकडून पर्जन्याची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येत असे. या कामासाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात असायचा. मात्र काही दिवसानंतर या ठिकाणी कर्मचारी ठेवणे बंद झाले. नागपूरस्थित हवामान खात्याच्या कार्यालयालाही अशी वास्तू सिरोंचा येथे अद्यापही गतवैभव टिकवून असल्याचे विस्मरण झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष घातल्यास गतवैभव पुन्हा लाभू शकते. यासाठी राज्य शासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.


१०७ वर्षांनंतरही विश्रामगृहे सुस्थितीत
गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याला निसर्गसौंदर्याची देणे आहे. त्यामुळे १९१० मध्ये ११ हजार ३६८ रूपये खर्चुन सिरोंचा येथे ब्रिटिश सरकारने विश्रामगृह बांधले. १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असल्याने सदर इमारती निर्लेखित करण्याविषयी भारत सरकारकडून पत्र येतात. मात्र ब्रिटिशांनी केलेल्या कामाचा दर्जा गुणवत्तापूर्ण व सुसंगत असल्याने या इमारती अजूनही अभेद्य आहेत. सिरोंचा तालुक्यातील बामणी, सोमनपल्ली व कोपेला या आदिवासी व दुर्गम भागातही ब्रिटिशकालीन विश्रामगृहे आहेत. बामनीच्या विश्रामगृहात उपपोलीस स्टेशन थाटले आहे. सोमनपल्लीच्या विश्रामगृहाची दुरावस्था झाली आहे, तर कोपेला येथील विश्रामगृहाची समाजकंटकांनी २३ मार्च २००९ रोजी जाळपोळ केली. या इमारतींचे जतन होण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ऐतिहासिक वास्तूंकडे सरकारचा कानाडोळा होत आहे.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष
तहसील कार्यालयामागे ध्वजस्तंभाजवळ ही टॉवरवजा वास्तू असून तिच्या लाकडी पायऱ्या जीर्ण झाल्या आहेत. एकमेव सागवानी दाराची मोडतोड झाली आहे. टॉवरच्या शिर्ष भागावर अमलतासचे झाड उगवले आहे. दर दिवसागणिक त्याचा आकार व घेर वाढत आहे. या झाडामुळे टॉवरला धोका निर्माण झाला आहे.
सध्या ही वास्तू पूर्व दिशेकडे झुकली आहे. आठवडी बाजार, तहसील कार्यालयाचे कर्मचारी व नागरिकांची रहदारी येथूनच राहते. वास्तू कोसळून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटने हे पुष्कर यात्रेचा आढावा घेण्यासाठी सिरोंचा येथे आले असता सदर पर्जन्यमापक इमारतीची दुरवस्था लक्षात घेवून दुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतर या इमारकडे प्रशासनाचे कायमचे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Rain count tower of British Era is in bad condition in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार