राज्यात दोन नवीन कारागृहांचा प्रस्ताव, अप्पर पोलीस महासंचालकांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 07:18 PM2018-03-20T19:18:31+5:302018-03-20T19:18:31+5:30

The proposal of two new prisons in the state, information of the Additional Director General of Police | राज्यात दोन नवीन कारागृहांचा प्रस्ताव, अप्पर पोलीस महासंचालकांची माहिती

राज्यात दोन नवीन कारागृहांचा प्रस्ताव, अप्पर पोलीस महासंचालकांची माहिती

Next

गडचिरोली : विदर्भ किंवा मराठवाड्यातील कारागृहांमध्ये अतिरिक्त कैद्यांचे ‘लोड’ फारसे नाही. पण मुंबई-पुण्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी आहेत. त्यामुळे त्या भागात दोन नवीन कारागृहांचे प्रस्ताव शासनाकडे दिले असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. गडचिरोली येथील खुल्या कारागृहाचे निरीक्षण केल्यानंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते.
तीन वर्षांपूर्वी गडचिरोलीत सुरू झालेल्या खुल्या कारागृहाला मंगळवारी प्रथमच अपर पोलीस महासंचालकांनी भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, कारागृहाचे प्रभारी अधीक्षक डी.एस.आडे, निरीक्षक बी.सी.निमगडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ.उपाध्याय यांनी सांगितले की, राज्यातील कारागृहांमध्ये अतिरिक्त कैद्यांची संख्या सोडता दुसरी कोणतीही समस्या नाही. कच्च्या कैद्यांच्या पेशीसाठी सर्व कारागृहांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. पण न्यायालयांच्या सूचनेनुसार त्याचा वापर केला जातो. सद्यस्थितीत २० ते २५ टक्के कैद्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने पेशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण घेणाऱ्या कैद्यांची संख्या वाढली
कारागृहांमध्ये राहून मुक्त विद्यापीठांच्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाºया कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी त्यांना गरजेनुसार पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. याशिवाय आता कारागृह म्हणजे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण राहिले नाही तर विविध व्यावसायिक प्रशिक्षण व कामांमधून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शेतीकाम, सुतारकाम, विणकाम, लाँड्री, पेंटींग अशी विविध व्यावसायिक कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत.

Web Title: The proposal of two new prisons in the state, information of the Additional Director General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.