पालकमंत्र्यांनी जाणल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:52 PM2019-04-23T23:52:13+5:302019-04-23T23:52:38+5:30

दुर्गम भागातील व्यंकटापूर येथे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सोमवारी अचानक भेट देऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर अनेक समस्या मांडल्या. सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिले.

The problem of Guardian Minister's Message | पालकमंत्र्यांनी जाणल्या समस्या

पालकमंत्र्यांनी जाणल्या समस्या

googlenewsNext
ठळक मुद्देव्यंकटापूरला भेट : परिसरातील समस्यांवर केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : दुर्गम भागातील व्यंकटापूर येथे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सोमवारी अचानक भेट देऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर अनेक समस्या मांडल्या. सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिले.
मागील चार वर्षाच्या काळात व्यंकटापूर परिसरातील अनेक समस्या सोडविण्यावर भर देण्यात आला आहे. या भागात पक्क्या रस्त्यांचा अभाव होता. शासनस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या भागात पक्क्या रस्त्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. काही दिवसांतच सदर बांधकाम पूर्ण होईल, तसेच व्यंकटापूर व वट्रा या मार्गे बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांसाठी सोयीचे होईल असे पालकमंत्री म्हणाले.
येथील हनुमान मंदिराचे बांधकाम व सुशोभीकरणासाठी जिल्हा पर्यटन विभागांतर्गत ९५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे ते म्हणाले.
दरम्यान नागरिकांनी मांडलेल्या इतरही समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी व्यंकटय्या परकीवार, सरपंच व्यंकन्न कोडापे, रवींद्र परकिवार, बंडू मुरमाडे यांच्यासह व्यंकटापूर येथील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The problem of Guardian Minister's Message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.