मंत्र्यांकडून तारण योजनेचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:18 AM2018-02-17T01:18:11+5:302018-02-17T01:18:31+5:30

कृउबासने राबविलेली तारण योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेला शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

Praise of Tarun Yojna by Ministers | मंत्र्यांकडून तारण योजनेचे कौतुक

मंत्र्यांकडून तारण योजनेचे कौतुक

Next
ठळक मुद्देसहकारमंत्र्यांची कार्यकर्त्यांशी चर्चा : पोरेड्डीवारांची नाळ सामान्यांशी जुळलेली

ऑनलाईन लोकमत
आरमोरी : कृउबासने राबविलेली तारण योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेला शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
आरमोरी येथे प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. कृष्णा गजबे, अरविंद पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, संतोष पाटील, जि.प. सदस्य भाग्यवान टेकाम, संपत आळे, खेमनाथ डोंगरवार, डॉ. दुर्वेश भोयर, जागोबा खेडेकर, कृउबास सभापती खिरसागर नाकाडे, उपसभापती ईश्वर पासेवार, संचालक पप्पूजी नागदेवे, व्यंकटी नागिलवार, मुकेश वाघाडे, चांगदेव फाये, मनोज मने, दीपक निंबेकार, नगरसेवक अ‍ॅड. वालदे, हरीदर पंजवानी, काशिराम शेबे, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. देशमुख म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात सहकारी चळवळ रूजविण्याचे काम पोरेड्डीवार यांनी केले आहे. पोरेड्डीवार यांची नाळ सर्वसामान्य कार्यकर्त्याशी जुळली आहे. सहकार क्षेत्रात काम करताना सामान्य माणसाला सक्षम करण्यासाठी सदैव तत्पर असावे लागते, हे काम अरविंद पोरेड्डीवार यांनी केले आहे, असे गौरवोद्गार देशमुख यांनी काढले. आ. कृष्णा गजबे यांनी मार्गदर्शन करताना माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला घडविण्यात पोरेड्डीवारांचा मोठा वाटा आहे. सत्ता येईल, जाईल परंतु चांगल्या विचारांच्या माणसासोबत आयुष्यभर राहण्याची साधना मला पोरेड्डीवार परिवाराकडून मिळाली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात आपण आरमोरी विधानसभेचे नेतृत्व करीत आहे, असे मार्गदर्शन केले.
अरविंद पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन करताना सोलापूरसारख्या बलाढ्य जिल्ह्यात विविध सहकारी संस्था काढून सहकाराच्या माध्यमातून देशमुख यांनी कार्यकर्त्यांना चालना देऊन ते मंत्रीपदावर विराजमान झाले असल्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्रीहरी कोपुलवार यांनी केले.
आरमोरी कृउबासच्या कार्याची केली प्रशंसा
ना. सुभाष देशमुख यांनी आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन शेतमाल तारण योजनेअंतर्गत गोदामात ठेवण्यात आलेल्या शेतमालाची पाहणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांचा आढावा घेतला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या योजनांची प्रशंसा केली.
आरमोरी येथे कोसा निर्मितीचे केंद्र आहे. या केंद्राला ना. देशमुख यांनी भेट दिली. यावेळी अरविंद पोरेड्डीवार यांनी कोसाचे कॅपड व कोसाचे पॅन्टपिस देशमुख यांना आरमोरीची आठवण म्हणून भेट दिली. यावेळी देशमुख यांनी कोसा उत्पादनाला चालना देण्यासाठी कोसा सहकारी संस्था स्थापन करण्यावर शासन सकारात्मक विचार करीत असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासन दिले.

Web Title: Praise of Tarun Yojna by Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.