शिक्षणासह कला जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:20 AM2018-02-24T01:20:16+5:302018-02-24T01:20:16+5:30

स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळत असते. आपल्याला पुढची वाटचाल करण्याकरिता कलागुणांसोबतच अभ्यासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Practice art with education | शिक्षणासह कला जपा

शिक्षणासह कला जपा

Next
ठळक मुद्देजि.प.अध्यक्षांचे प्रतिपादन : चामोर्शी येथे कृषिरंग स्नेहसंमेलन

ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळत असते. आपल्याला पुढची वाटचाल करण्याकरिता कलागुणांसोबतच अभ्यासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे गरजेचे आहे. शिक्षणासह इतर कलाही जपल्यास सर्वांगीण विकास होऊन ध्येय निश्चितच गाठता येते, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.
चामोर्शी येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात तीन दिवसीय कृषिरंग स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोदीप संस्थेच्या सचिव स्नेहा हरडे होत्या. विशेष अतिथी म्हणून पीएसआय निशा खोब्रागडे, रूचिता हरडे, प्राचार्य डॉ. दिनेश सुरजे, कार्यक्रम अधिकारी छबील दुधबळे, प्रा. तुषार पाकवार, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पाजनकर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा महाविद्यालयातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन अर्पिता नंदेश्वर व विक्रम फंदी तर आभार छकुली उघडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी तुषार भांडारकर, कमलेश चांदेवार, श्रीकांत सरदारे, भोजराज कुमरे, विनोद वरकडे, रूपेश चौधरी, अभिजीत उपरकर, कोमल काळे, श्याम मोटे, शारदा दुर्गे, कर्मचारी प्रशांत मातोरे, संतोष पांचलवार, मधुकर पिठाले, संदीप रहाटे, श्याम भैसारे, देवराव ठाकरे, यशवंत भरणे, अनिल घोंगडे, विकास मडावी, मानकर, सूरज बावणे, दत्तू उराडे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
विविध कार्यक्रम
तीन दिवसीय स्नेहसंमेलनात एकांकिका, नाटक, एकलनृत्य, समूहनृत्य, गायन स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, प्रश्न मंजूषा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Practice art with education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.