पोलिसांनी गंभीर प्रकरण दडपले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:35 PM2018-01-18T23:35:30+5:302018-01-18T23:35:54+5:30

आपली मुलगी मोनिका किरण जंबेवार हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सासरच्या मंडळीविरोधात आपण गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी न करता हे प्रकरण दडपले असल्याचा आरोप मृतक मुलीच्या आई-वडिलासह बसपाचे पदाधिकारी रमेश मडावी, ....

Police suppressed serious cases? | पोलिसांनी गंभीर प्रकरण दडपले?

पोलिसांनी गंभीर प्रकरण दडपले?

Next
ठळक मुद्देआई-वडिलांसह पदाधिकाऱ्यांचा आरोप : गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आपली मुलगी मोनिका किरण जंबेवार हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सासरच्या मंडळीविरोधात आपण गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी न करता हे प्रकरण दडपले असल्याचा आरोप मृतक मुलीच्या आई-वडिलासह बसपाचे पदाधिकारी रमेश मडावी, आप पक्षाचे पदाधिकारी प्रा.अशोक लांजेवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी संजय मादेशवार, कृष्णा वाघाडे, विजय गणवेनवार, अन्यायग्रस्त कुटुंबिय, संजीत पाल, कमला पाल, रंजीत पाल आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना कोटगल येथील पाल कुटुंबियांनी सांगितले की, आमची मुलगी मोनिका हिचा आंतरजातीय प्रेमविवाह गडचिरोली येथील किरण जंबेवार यांच्याशी २०१६ मध्ये झाला. मुलगी जंबेवार यांच्या घरी व्यवस्थित नांदत असूनही तिला सासू-सासरे व जावयाकडून नेहमी त्रास दिला जात होता. अशाही परिस्थितीत आपण जावयाला अनेकदा मदत म्हणून पैसे दिले. लग्न झाल्यावर सहा महिन्यानंतर जावई व त्याच्या आई-वडिलांनी आपली मुलगी मोनिका हिच्याशी पुन्हा भांडण करून घरातून काढून दिले. एक महिना आमच्या घरी राहिल्यानंतर आमच्या नातेवाईकांनी जावयाला समजावून मोनिकाला सासरी नेऊन दिले. दरम्यान मोनिका गर्भवती राहिली. त्यानंतरही तिला त्रास देणे सुरूच होते. २८ सप्टेंबर २०१७ ला खासगी दवाखान्यात मोनिकाला भरती केल्याचे जावयांनी फोनवरून सांगितले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात ती मरण पावली, असे सांगण्यात आले. संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलिसांत आम्ही तक्रार दिली. मात्र तीन महिन्यांचा कालावधी होऊनही जावई, सासू-सासरे यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असे सांगितले.
अन्यायग्रस्त कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा प्रा. अशोक लांजेवार यांनी पत्रकार परिषदेला दिला.

Web Title: Police suppressed serious cases?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस