दीड लाखावर रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:53 PM2019-04-26T23:53:32+5:302019-04-26T23:54:06+5:30

शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड केली जाते. यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण रोपवाटिका विक्रमपूर व चामोर्शी वन परिक्षेत्रांतर्गत अस्थायी रोपवाटिका सोनापूर यांच्या वतीने १ लाख ६५ हजार ८४० रोपांची लागवड करण्यात आली आहे.

 Planting of seedlings at one and a half lakh | दीड लाखावर रोपांची लागवड

दीड लाखावर रोपांची लागवड

Next
ठळक मुद्देचामोर्शी येथील रोपवाटिका : सामाजिक वनीकरण व वन परिक्षेत्र कार्यालयाचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड केली जाते. यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण रोपवाटिका विक्रमपूर व चामोर्शी वन परिक्षेत्रांतर्गत अस्थायी रोपवाटिका सोनापूर यांच्या वतीने १ लाख ६५ हजार ८४० रोपांची लागवड करण्यात आली आहे.
शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेसाठी अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी अडीच महिन्यात रोपे लागवडीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रोपांची निगा व पाण्याची व्यवस्था करण्याकरिता ४० मजूर काम करीत आहेत. रोपवाटिकेत विविध जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. विक्रमपूर रोपवाटिकेत १ लाखाच्या वर रोपांची लागवड करण्यात आली असून या रोपांची निगा योग्य प्रकारे राखली जात आहे, अशी माहिती सहायक लागवड अधिकारी वासुदेव घेरकर व वनसेवक माणिक बनिक यांनी दिली. तर अस्थायी रोपवाटिकेत वेगवेगळ्या जातींच्या २८ हजार ४४३ रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती आरएफओ पी. के. लेले, आरओ आर. डी. तोकला यांनी दिली.

विविध प्रजातींच्या रोपांचा समावेश
सामाजिक वनीकरण रोपवाटिका विक्रमपूर येथे करंजीची १० हजार, सिसव १० हजार, रिअ‍ॅल्ट्री १५ हजार, विरहाफारम १० हजार, गुलमोहर ५ हजार, बहावा २ हजार ५००, कॅसिया २ हजार, जंगली बदाम १ हजार, आंबा २ हजार, जांभुळ ५००, आवळा ५ हजार, डाळींब १२ हजार, वड ५००, पिंपळ २ हजार ५००, बेल २ हजार ५००, कडूनिंब १० हजार ५००, निलगिरी २० हजार, मुंगना ३ हजार, बांबू १० हजार, जांबाची १५ हजार रोपे लागवड केली आहेत. तर सोनापूर येथे बांबूची १९ हजार ८०७, आवळ्याची २ हजार ५१२, बहाव्याची ५५६, चिंचेची ५ हजार २६४, जांभळाची २२४ रोपे लागवड करण्यात आली आहेत. उन्हाळ्यात या रोपांची निगा राखण्याकरिता हिरव्या जाळीची व्यवस्था करण्यात आली असून रोगमुक्तीसाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जात आहे.

Web Title:  Planting of seedlings at one and a half lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.