येरमनार येथे ‘पेन करसड जत्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:31 PM2019-04-19T22:31:14+5:302019-04-19T22:32:02+5:30

अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील पेरमिलीपासून १० किमी अंतरावर असलेल्या येरमनार गावात दर तीन वर्षांनी आदिवासी बांधवांच्या वतीने पेन करसळ जत्रा भरविली जाते. यंदाही सलग तीन दिवस ही जत्रा उत्साहात भरली.

'Pen Karad Jatra' at Yerarmar | येरमनार येथे ‘पेन करसड जत्रा’

येरमनार येथे ‘पेन करसड जत्रा’

Next
ठळक मुद्देभाविकांचा जनसागर उसळला : आदिवासी संस्कृतीचे घडले दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील पेरमिलीपासून १० किमी अंतरावर असलेल्या येरमनार गावात दर तीन वर्षांनी आदिवासी बांधवांच्या वतीने पेन करसळ जत्रा भरविली जाते. यंदाही सलग तीन दिवस ही जत्रा उत्साहात भरली.
अहेरी उपविभागासह छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने या जत्रेला आले होते. तीन दिवस चालणाºया या जत्रा उत्सवातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. पेन करसड म्हणजे देवीदेवतांच्या खेळण्याचा उत्सव होय. या उत्सवासाठी येरमनार परिसरातील आदिवासी समाजबांधव लोकवर्गणी गोळा करतात. उत्सवाच्या प्रारंभी भूमीया, पेरमा या गावपुजाऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी कैैलास कोरेत, येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, पेरमिलीचे सरपंच अमोल आत्राम, विठूजी मेश्राम, देवाजी सडमेक, लक्ष्मण कुळमेथे, रामा आत्राम, गावपाटील इंदरशाह आत्राम, विजय आत्राम, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, सूरज आत्राम आदी उपस्थित होते.
सदर उत्सवादरम्यान धार्मिक संस्कृतीतून आदिवासी समाजाची संघटन शक्ती दिसून आली. तसेच विशेष पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर ढोल, पाईनग, कुळडी, तकलस या पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी समाज बांधवांनी रेलानृत्य केले. सदर तीनदिवसीय जत्रेत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अहेरी उपविभागातील आदिवासी समाजातर्फे अशाप्रकारचे धार्मिक उत्सव आजही साजरे केले जातात.

Web Title: 'Pen Karad Jatra' at Yerarmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.