पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:04 AM2019-05-15T00:04:30+5:302019-05-15T00:05:03+5:30

जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला.

Parents secretary reviewed the drought situation | पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात पाणी-चारा टंचाई नाही : वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईबाबत माहिती दिली. सप्टेंबर २०१८ च्या पाणी टंचाई अहवालाच्या आधारे जिल्ह्यात टंचाईचा टप्पा १ व २ मध्ये टंचाईसदृश परिस्थिती नसल्यामुळे निरंक पाणी टंचाई आराखडे सादर केले. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी सांगितले, जिल्ह्यात गाई म्हशी, बैल, शेळी, मेंढी यांची संख्या ७ लाख ९४ हजार १५९ असून उपलब्ध चाऱ्याच्या स्त्रोतानुसार म्हणजेच वनक्षेत्र, बांधावरील, कृषिक्षेत्र आदी ठिकाणाहून वर्षभरात गोळा होत असलेला चारा पशुधनासाठी पुरेसा आहे. जिल्ह्यात टंचाई नाही, असे ते म्हणाले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घेतली असल्याचे सांगितले.
या बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषि अधीक्षक अनंत पोटे, उपसंचालक जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर, नरेगाचे बिडीओ एस.पी.पडघन, समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावर्षी खरीपाचे क्षेत्र वाढणार
जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १५०२.३८ मिमी इतके आहे. गेल्या खरीप हंगामात १३५५.३१ अर्थात ९५.९३ टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक १३५.१० टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी ७४.७८ टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता.
जिल्हयात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र १.५ लाख हेक्टर असले तरी गेल्या हंगामात १.८२ लाख हेक्टरवर (११९ टक्के) धान पेरणी झाली हे लक्षात घेऊन येणाऱ्या २०१९-२० च्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले चार सुत्री धान लागवड तंत्रज्ञान, तसेच श्री पध्दतीने लागवड याचा अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यात येत आहे. या पध्दतीने लागवड केल्यास उत्पादन ५५ टक्के अधिक मिळते, अशी माहिती यावेळी पालक सचिवांना देण्यात आली.

Web Title: Parents secretary reviewed the drought situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.