एका दारूविक्रेत्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:08 AM2019-06-21T00:08:05+5:302019-06-21T00:08:27+5:30

तालुक्यातील पंदेवाही येथील गाव संघटनेच्या महिलांनी देशी दारूची विक्री करणाऱ्याच्या घरी धाड टाकून दारू विक्रेत्याला मुद्देमालासह पकडले. संजय दंडिकवार असे आरोपीचे नाव आहे. मुद्देमालासह त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

One alcohol shopkeeper arrested | एका दारूविक्रेत्यास अटक

एका दारूविक्रेत्यास अटक

Next
ठळक मुद्देपंदेवाही येथील कारवाई : गावसंघटनेच्या महिलांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील पंदेवाही येथील गाव संघटनेच्या महिलांनी देशी दारूची विक्री करणाऱ्याच्या घरी धाड टाकून दारू विक्रेत्याला मुद्देमालासह पकडले. संजय दंडिकवार असे आरोपीचे नाव आहे. मुद्देमालासह त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पंदेवाही येथे काही जण देशी दारूची विक्री करतात. परिणामी गावाचे सामाजिक आरोग्य बिघडत आहे. हा प्रकार थांबावा, यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला. इतकेच नाही तर गावातील दारूबंदीसाठी खास पोलो ठेवून दारूविक्रेत्यांना विक्री बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे अनेकांनी विक्री बंद केली असली तरी संजय दंडिकवार हा चोरून लपून दारूची विक्री करीत होता. विक्रीसाठी त्याने घरी दारू आणल्याचा सुगावा मंगळवारी महिलांना लागला. संघटनेच्या महिलांनी थेट त्याच्या घरी धाड मारून दारूसाठा जप्त केला. या कारवाईत गावातील भूमैया, पाटील, पोलीस पाटील, ग्रा. पं. सदस्य, पेसा अध्यक्ष हे देखील सहभागी झाले होते. गुरुवारी दारूसाठा व आरोपीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. पंदेवाही गावातील ही पहिलीच अहिंसक कृती होती. विक्रेयांवर अंकुश ठेवण्यासाठी आता महिला पुढे सरसावल्या आहेत.

पंच व साक्षीदार बळकट राहण्यावर मार्गदर्शन
गाव संघटनेच्या ४० ते ५० महिला दारू घेऊन पोलीस ठाण्यावर धडकल्या व पकडलेली दारू पोलिसांच्या स्वाधीन केली. सोबतच दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदनही दिले. विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर शिक्षा होण्यासाठी केस मजबूत होणे आवश्यक असते. त्यामुळे पंच आणि साक्षीदारांची खंबीर भूमिका आरोपीला शिक्षा होण्यासाठी कशी आवश्यक हे समजावून सांगण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम एटापल्लीच्या पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आला. मुक्तिपथ तालुका संघटन किशोर मल्लेवार यांनी महिलांना पंच आणि साक्षीदार कसे मजबूत असायला हवे, त्यांचे किती महत्व आहे याविषयी मार्गदर्शन केले. कुणालाही न भीता साक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

Web Title: One alcohol shopkeeper arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.