गडचिरोलीत नक्षल्यांनी गोळ्या झाडून केली एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:35 AM2017-12-22T10:35:38+5:302017-12-22T10:37:20+5:30

अहेरी तालुक्यातील पेरमिलीपासून दहा किमी अंतरावर असलेल्या हिंदभट्टी येथे नक्षल्यांनी एका इसमाच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली.

Naxals shot dead one in Gadchiroli | गडचिरोलीत नक्षल्यांनी गोळ्या झाडून केली एकाची हत्या

गडचिरोलीत नक्षल्यांनी गोळ्या झाडून केली एकाची हत्या

Next
ठळक मुद्देएकाला मारहाण अहेरी तालुक्यातील हिंदभट्टी येथील घटना

आॅनलाईन लोकमत
पेरमिली (गडचिरोली) : अहेरी तालुक्यातील पेरमिलीपासून दहा किमी अंतरावर असलेल्या हिंदभट्टी येथे नक्षल्यांनी एका इसमाच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. गावातील आणखी एका व्यक्तीला काठीने जबर मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सदर घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
मधुकर चिन्ना आत्राम (४०) रा. हिंदभट्टी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून रेनो दोगे गावडे (४२) रा. हिंदभट्टी असे जखमीचे नाव आहे. मधुकर आत्राम व रेनो गावडे हे दोघेही पोलिसांचे खबरे असल्याचा संशय नक्षल्यांना होता. बुधवारी रात्री मधुकर घरी झोपला असताना २० ते २५ च्या संख्येत असलेल्या नक्षल्यांनी त्याला उठविले. घराबाहेर निघाल्यानंतर गावातील रस्त्यावर आणून त्याच्या डोक्यात बंदुकीने गोळ्या झाडल्या. मधुकर जागीच गतप्राण झाला.
त्यानंतर रेनो गावडे याचे घर गाठून त्यालाही काठीने जबर मारहाण केली. गावकऱ्यांनी त्याला पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. हिंदभट्टी गावात केवळ १० ते १२ घरांची वस्ती आहे. मधुकरच्या मृतदेहाजवळ नक्षल्यांनी नक्षलपत्रके टाकली. त्यात मधुकर आत्राम व रेनो गावडे हे दोघेही पोलिसांचे खबरे असल्याचे लिहीले आहे. मधुकरच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे.

Web Title: Naxals shot dead one in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.