मानवाधिकार संघटनेतर्फे नक्षलवाद्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:10 AM2019-01-24T01:10:59+5:302019-01-24T01:12:14+5:30

नक्षलवाद्यांकडून निष्पाप तीन नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनेचा मानवाधिकार परिषदेतर्फे बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, .....

Naxalites protest by human rights organization | मानवाधिकार संघटनेतर्फे नक्षलवाद्यांचा निषेध

मानवाधिकार संघटनेतर्फे नक्षलवाद्यांचा निषेध

Next
ठळक मुद्देशासनाकडे मागणी : नक्षलपीडित कुटुंबांना मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून निष्पाप तीन नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनेचा मानवाधिकार परिषदेतर्फे बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
भारतीय मानवाधिकार परिषद संलग्नित नक्षलपीडित पुनर्वसन समितीने नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी याप्रसंगी केली. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दुर्गम भागातील नागरिकांची हत्या करण्यात येत आहे. हत्या झाल्यानंतर नागरिकांचे कुटुंब उघड्यावर पडते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाईमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. कसनासूर गावात नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी मारल्या गेले होते. या घटनेत पोलिसांना नक्षलवाद्यांची माहिती गावकऱ्यांनी दिली, असा संशय घेत नक्षलवाद्यांनी कसनासूर गावातील मालू मडावी, कन्ना मडावी, लालसू कुडयेटी यांची हत्या केली. त्यामुळे गावातील नागरिकांना गाव सोडून पोलीस मदत केंद्रात आश्रय घ्यावे लागले. या घटनेमुळे दुर्गम भागातील आदिवासी व नक्षलपीडित नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे, असे मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांविरोधात मानवाधिकार परिषदेच्या वतीने इंदिरा गांधी चौकात नक्षलवाद्यांचा निषेध करून नक्षलपीडित कुटुंबीयांना तत्काळ १० लाख रूपयांची मदत द्यावी, एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरी द्यावी, नक्षल्यांच्या भीतीने गाव सोडून भटकणाऱ्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, शहरी भागातील नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
निषेध नोंदविताना मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे, व्ही.एन.मडावी, मधुकर उसेंडी, मनोज कांदो, संदीप वाघमारे, साईनाथ पेंडालवार, सुरेश नरोटी, बाबुराव धुर्वा, मनोज कोवासे, अशोक कोरसामी, सतीश गोटा, राजेश लेकामी, राजू दुर्वा, मधुकर मट्टामी, पेका मट्टामी, दुलसा नरोटे, लालसू नरोटे, रोशन बावणे, गौतम मेश्राम, सोनल पुंगाटी, अविनाश मेश्राम, संदीप मडावी, सचिन खोब्रागडे व नक्षलपीडित हजर होते.

Web Title: Naxalites protest by human rights organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.