नक्षल्यांनी हत्या केलेल्या युवकाचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:00 PM2017-11-24T22:00:40+5:302017-11-24T22:00:52+5:30

रेगडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या करमेटोला येथील राकेश डोडरा पोई या युवकाची नक्षल्यांनी २०११ साली हत्या केली. २३ नोव्हेंबर रोजी करमेटोला गावातील नागरिकांनी राकेश पोई याचे स्मारक बांधले आहे.

Memorial monument of Maoists killed | नक्षल्यांनी हत्या केलेल्या युवकाचे स्मारक

नक्षल्यांनी हत्या केलेल्या युवकाचे स्मारक

Next
ठळक मुद्देकरमेटोलावासीय आक्रमक : नक्षल्यांना गावात पाय ठेवू न देण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रेगडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या करमेटोला येथील राकेश डोडरा पोई या युवकाची नक्षल्यांनी २०११ साली हत्या केली. २३ नोव्हेंबर रोजी करमेटोला गावातील नागरिकांनी राकेश पोई याचे स्मारक बांधले आहे.
राकेश पोई याचे पोलीस बनण्याचे स्वप्न होते. यासाठी त्याने पोलीस भरतीमध्ये सहभाग घेतला होता. आपल्या वर्चस्वाखाली पोलीस भरतीसाठी उतरला आहे. ही बाब नक्षल्यांच्या पचनी पडली नाही. त्यांनी राकेशची गावात सर्वांसमोर गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेपासून कमेटोला येथील नागरिक नक्षल्यांचा प्रचंड प्रमाणात विरोध करतात. गावातील काही नागरिकांनी तर नक्षल्यांना उघडपणे आव्हान दिले आहे. रेगडी पोलिसांनी करमेटोला येथे जाऊन राकेश पोई या युवकाच स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक बांधले. गावकºयांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण केली. मागील तीन दिवसांपासून नागरिकांची हत्या करण्याच्या घटना सतत घडत आहेत. याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नक्षल्यांना स्थानिक नागरिक व आदिवासींबाबत काहीच कळवळा नसून केवळ आपल्या दबदबाच्या भरवशावर वसुली करायची आहे. असा आरोप केला. महिला व बालकांनी नक्षल विरोधी फलक हातात घेऊन झाडापापडा, लाहेरी टोला येथील नक्षल्यांनी केलेल्या निष्पाप युवकांच्या हत्येचा निषेध केला आहे. या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन नक्षल विरोधी चळवळ उभारली आहे. उभारली आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला या परिसरात फार मोठा हादरा बसला आहे. यानंतरही नक्षल्यांना गावात पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

Web Title: Memorial monument of Maoists killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.