दाम्पत्यांच्या हस्ते मार्र्कं डेश्वराची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:46 PM2018-08-13T22:46:59+5:302018-08-13T22:47:18+5:30

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेण्याबरोबरच पूजाअर्चा करण्यासाठी मार्र्कंडेश्वर मंदिरात गर्दी उसळली होती.

Markandeshwar's Pooja at the hands of the couple | दाम्पत्यांच्या हस्ते मार्र्कं डेश्वराची पूजा

दाम्पत्यांच्या हस्ते मार्र्कं डेश्वराची पूजा

Next
ठळक मुद्देपहिला श्रावण सोमवार : जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर जोडप्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी/मार्र्कंडादेव : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेण्याबरोबरच पूजाअर्चा करण्यासाठी मार्र्कंडेश्वर मंदिरात गर्दी उसळली होती.
दैनिक पूजेचे यजमान मंगेश आनंदवार त्यांच्या पत्नी शीतल आनंदवार, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर त्याचे पती मधुकर भांडेकर, जि.प.सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार त्यांच्या पत्नी साधना गण्यारपवार, व्यावसायिक चिराग गांधी त्यांच्या पत्नी प्रियंका चिराग गांधी यांच्या हस्ते श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सकाळी पूजाअर्चा, अभिषेक, बिल्वार्चन करण्यात आले.
यावेळी मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामू तिवाडे, पूजारी श्रीकांत पांडे, व्यवस्थापक जनार्धन जुनघरे, पुरूषोत्तम शेंडे, सोनल भावडकर, रूपेश चलाख, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, विलास चरडुके, उज्ज्वल गायकवाड, संकेत गायकवाड, मोनू जनजालवार, शेशांत बारसागडे आदी उपस्थित होते.
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याबरोबरच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्याचबरोबर वैनगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने मार्कंडेश्वर मंदिर परिसराचे निसर्गसौंदर्य अधिकच फुलून दिसत आहे. मार्र्कंडेश्वर हे तालुक्यातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे तालुकाभरातील तसेच नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भाविक श्रावण महिन्यात मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात. प्रत्येक सोमवारी मार्र्कंडेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी उसळणार आहे.

Web Title: Markandeshwar's Pooja at the hands of the couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.