महावितरणने कापली ३२ मोबाईल टॉवरची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:34 AM2019-02-14T01:34:59+5:302019-02-14T01:36:08+5:30

बीएसएनएलने मागील दोन ते तीन महिन्यांपासून मोबाईल टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे ३२ मोबाईल टॉवर व एक्सचेंज आॅफीसचा वीज पुरवठा १२ फेब्रुवारी रोजी खंडित करण्यात आला.

Mahavitaran cuts 32 mobile tower power | महावितरणने कापली ३२ मोबाईल टॉवरची वीज

महावितरणने कापली ३२ मोबाईल टॉवरची वीज

Next
ठळक मुद्दे१७ टॉवरची सेवा ठप्प : वीज बिल न भरणे बीएसएनएलला नडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बीएसएनएलने मागील दोन ते तीन महिन्यांपासून मोबाईल टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे ३२ मोबाईल टॉवर व एक्सचेंज आॅफीसचा वीज पुरवठा १२ फेब्रुवारी रोजी खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित होताच खळबळून जागे झालेल्या बीएसएनएलच्या मुंबई येथील कार्यालयाने त्याच दिवशी दुपारपर्यंत १५ मोबाईल टॉवरचे वीज बिल भरले. त्यामुळे सदर मोबाईल टॉवर १३ फेब्रुवारी रोजी सुरू झाले. मात्र १७ मोबाईल टॉवरचा अजूनही वीज पुरवठा खंडितच आहे.
थकीत वीज बिलामुळे महावितरण आर्थिक अडचणीत येत आहे. त्यामुळे वीज बिल थकविणाऱ्या सामान्य ग्राहक, शासकीय कार्यालये किंवा कंपन्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. याची अंमलबजावणी महावितरण गडचिरोली जिल्ह्यात अतिशय कडकपणे करीत आहेत. बीएसएनएलच्या टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल भरण्याची जबाबदारी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे आहे. या कार्यालयाने नियमितपणे वीज बिल भरणे अपेक्षित आहे. मात्र दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही वीज बिलाचा भरणा करण्यात आला नाही. परिणामी वीज पुरवठा खंडित करण्याची नामुष्की बीएसएनएलला पत्करावी लागली.
मंगळवारी सकाळी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर दुपारपर्यंत वीज बिल भरण्यात आले. त्यानंतर बुधवारी एमएसईबीने वीज पुरवठा पुन्हा सुरू करून दिला. मात्र बीएसएनएलच्या दुर्लक्षितपणाच्या कारभाराचा फटका ग्राहकांना बसला आहे.काही ठिकाणी जनरेटर उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी दुपारच्या सुमारास जनरेटर लावले जात आहेत. मात्र डिझेलचीही समस्या गंभीर आहे. गडचिरोली जिल्ह्यात केवळ तालुकास्थळीच पेट्रोलपंप आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर आहे. अशा परिस्थितीत दिवसरात्रभर जनरेटरवर मोबाईल टॉवर चालविणेही कठीण होते.

या टॉवरचा वीज पुरवठा झाला खंडित
१७ टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल अजूनही भरण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचा वीज पुरवठा खंडितच आहे. यामध्ये विसापूर, आष्टी, सुंदरनगर, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, चामोर्शी, आलापल्ली हे आठ एक्सचेंज आॅफीस व सुंदरनगर, एटापल्ली, गडचिरोलीजीवळील सेमाना सोनसरी, अंगारा, घोट, कोरची, बोदली या टॉवरचा समावेश आहे.
१५ टॉवर व एक्स्चेंज आॅफीसचा वीज पुरवठा मंगळवारी खंडित करण्यात आला. त्याच दिवशी वीज बिल भरल्याने बुधवारी उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यामध्ये सिरोंचा, आरमोरी, वैरागड, मुरूमगाव, धानोरा, चातगाव, देसाईगंज एक्सचेंज आॅफीस तसेच तळोधी, आरमोरीतील बर्डी, पाथरगोटा, आरमोरी तहसील कार्यालय, सुकाळा, जोगीसाखरा, देलनवाडी, कासवी यांचा समावेश आहे.

Web Title: Mahavitaran cuts 32 mobile tower power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.