कायमसाठी पाठपुरावा करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:36 AM2017-11-20T00:36:44+5:302017-11-20T00:37:03+5:30

Let's follow up forever | कायमसाठी पाठपुरावा करू

कायमसाठी पाठपुरावा करू

Next
ठळक मुद्देखासदारांची ग्वाही : सर्वशिक्षा अभियानातील कर्मचाºयांचे अधिवेशन

ऑनलाईन लोकमत 
गडचिरोली : सर्व शिक्षा अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम असून या अभियानात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कर्मचारी करार कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.
सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृती समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूलमध्ये रविवारी एक दिवसीय अधिवेशन घेण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे पदाधिकारी रवींद्र ओल्लालवार, पं.स. उपसभापती विलास दशमुखे, नगर पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, कर्मचारी समितीचे सचिव भाऊराव हुकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संघटनेचे सल्लागार प्रफुल मेश्राम यांनी सर्व शिक्षा अभियानाचे कार्य व या कार्यात करार कर्मचाºयांचे योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी करार कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र शासनाने कर्मचाºयांच्या सेवेची दखल घेतली नाही, असे मेश्राम यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या सर्व शिक्षा अभियानातील करार कर्मचाºयांना शासनाच्या सेवेत कायम करण्याबाबतचा ठराव पारीत करण्यात आला. यावेळी संघटनेच्या अन्य पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष वकील खेडेकर, संचालन ताराचंद भुरसे यांनी केले तर आभार भाऊराव हुकरे यांनी मानले.

Web Title: Let's follow up forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.