एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:05 PM2019-07-22T23:05:28+5:302019-07-22T23:05:53+5:30

विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे.

Lack of conservatives in Atapalli taluka | एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकांचा अभाव

एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकांचा अभाव

Next
ठळक मुद्देवाहतुकीची साधने अपुरी : ट्रॅक्टरवर खाट मांडून रुग्णाला आणले रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार २१ जुलै रोजी रविवारला एटापल्ली तालुक्यात उघडकीस आला.
एटापल्लीपासून सात किमी अंतरावर असलेल्या वासामुंडी येथील एका रूग्णास ट्रॅक्टरवर खाट मांडून त्यावर त्याला झोपवून एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकासह इतर वाहतुकीच्या साधनांची कमतरता असल्याने गंभीर रूग्ण, गर्भवती माता तसेच बालके वेळेवर तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या रूग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी कित्येकांना जीव गमवावा लागल्या घटनाही घडलेल्या आहेत. अहेरी उपविभागात आरोग्य व रूग्णसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही गेल्या दोन ते तीन वर्षात सरकार व प्रशासनाला अहेरी उपविभागातील आरोग्य सेवा व वाहतूक सेवा बळकट करता आली नाही. एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागात भ्रमणध्वनी सेवा हवी तशी प्रभावी नाही. परिणामी बऱ्याचदा संपर्कही होत नाही. संपर्क झाला तरी इतर अडचणी जाणवतात. परिणामी एटापल्ली तालुक्यात रूग्णांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एटापल्ली तालुक्याचा काही भाग छत्तीसगड सिमेला लागून आहे. एटापल्ली तालुक्याला दुसरा तालुका जुळलेला नाही. एटापल्ली जवळ पाच ते दहा किमी अंतरावर अनेक गावांची सीमा समाप्त होते. तालुक्यात २०० गावे असून भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. शिवाय घनदाट जंगल व बारमाही वाहणारे नदी, नाले आहेत. रस्त्या-रस्त्यावर नाले व नदी पडत असल्याने या तालुक्यात वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.
रस्ते, वीज व बससेवाही ऐरणीवर
एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कित्येक गावांना पोहोचण्यासाठी अजुनही पक्के रस्ते नाहीत. शिवाय बºयाच गावांमध्ये वीज पुरवठा पोहोचला नाही. बस सेवा व मोबाईल नेटवर्कची समस्या भारी झाली आहे. एकूणच एटापल्ली तालुक्यात समस्यांची भरमार असून येथील आदिवासी व गैरआदिवासी लोकांचे जगणे कठीण झाले आहे.

Web Title: Lack of conservatives in Atapalli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.