आलापल्लीतील खसरा डेपो असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:07 AM2018-05-26T01:07:36+5:302018-05-26T01:07:36+5:30

आलापल्ली येथील खसरा विक्री आगारात कोट्यवधी रूपयांचे सागवान, बांबू, जळाऊ बिट तसेच बांबू उपलब्ध आहे. मात्र या विक्री आगाराच्या सुरक्षेबाबत वन विभाग गंभीर असल्याचे दिसून येत नाही. सध्या नक्षलवाद्यांकडून आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या डेपोची जाळपोळ सुरू आहे.

Khasra Depot in Alpelli is unsafe | आलापल्लीतील खसरा डेपो असुरक्षित

आलापल्लीतील खसरा डेपो असुरक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वी पाच ते सहा वेळा झाली जाळपोळ : कोट्यवधी रूपयाची संपती वाऱ्यावर, वनविभाग कमालीचा सुस्त

प्रशांत ठेपाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली येथील खसरा विक्री आगारात कोट्यवधी रूपयांचे सागवान, बांबू, जळाऊ बिट तसेच बांबू उपलब्ध आहे. मात्र या विक्री आगाराच्या सुरक्षेबाबत वन विभाग गंभीर असल्याचे दिसून येत नाही. सध्या नक्षलवाद्यांकडून आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या डेपोची जाळपोळ सुरू आहे. मात्र असे प्रकार होत असताना देखील वन विभागाने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून या डेपोमध्ये कोणतीही उपाययोजना केली नाही.
आलापल्ली-एटापल्ली या मुख्य मार्गावर आलापल्लीपासून अर्धा किमी अंतरावर ३५ वर्ष जुना खसरा डेपो पूर्णत: असुरक्षित आहे. महाराष्ट्रातील क्रमांक १ चा बिट विक्री डेपो म्हणून प्रसिध्द आहे. सध्या या बिटात जवळपास साग व इतर प्रकारचे मिळून ११ हजार बिट उपलब्ध आहेत. यातील सात हजार बिट सागवान व चार हजार बिट सिसमचे आहे. या डेपोत २००९ पासून बराच माल शिल्लक पडलेला दिसून येतो. यात प्रामुख्याने ४०० घन मीटर इमारती माल उपलब्ध असून यातील काही मालाची विक्री झाली. जवळपास दोन लाखापेक्षा अधिक लांब बांबू या डेपोत उपलब्ध आहे. एकदा खरेदी केलेला माल समाजकंटक अथवा विघातक कृत्यांमध्ये जळून नष्ट होत असेल तर शासनाकडून ग्राहकाला कोणतीही नुकसान भरपाई मिळण्याची शाश्वती नाही. सदर माल आगीत भस्म झाल्यास ग्राहकाला संपूर्ण मालाचे पैसे अदा करावे लागते. म्हणजे ग्राहकाचा मालही गेला व पैसेही गेले, अशी परिस्थिती होते. यापूर्वी सदर डेपोला पाच ते सहा वेळा आग लागली. यात खरेदीदारांचे व ठेकेदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. २००९ पासून अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या बिट डेपोकडे लोकांनी पाठ फिरविली आहे. मागील दहा वर्षात या आगाराचे १०० कोटी रूपये रॉयल्टीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. असे असले तरी सद्य:स्थितीत सदर खसरा डेपोमधून वर्षाकाठी १० कोटीचा महसूल शासनाला प्राप्त होत असतो. मात्र या डेपोच्या सुरक्षीततेकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

रात्री चौकीदारांच्या भरवशावरच डेपो
सदर डेपोत एकूण १० ते १२ नियमित कर्मचारी असून याच कर्मचाºयांच्या भरवशावर ४१ हेक्टरमधील या डेपोची सुरक्षा अवलंबून आहे. रात्रपाळीला येथे तीन ते चार चौकीदार कर्तव्यावर असतात. सुरक्षेच्या दृष्टीने या डेपोत एकच लोखंडी मचान आहे. मात्र त्याला सर्च लाईटची व्यवस्था नाही. एवढ्या मोठ्या या खसरा डेपोत कुठल्याही भागात दिव्यांची व्यवस्था नाही. चौकीदारांसाठी वन प्रशासनाने टार्चचा पुरवठा केलेला नाही. येथील चौकीदार स्वत:कडीलच टार्च वापरतात. सदर डेपोमध्ये केवळ कार्यालयपुरता मर्यादीत विद्युत पुरवठा आहे. दोन हातपंप पाण्यासाठी उपलब्ध असून येथे लाकूड फाटा मोठ्या प्रमाणात असल्याने सरपटणाºया प्राण्यांचा प्रादुर्भाव आहे. प्राथमिक उपचाराची कोणतीही सोय नाही. जाळपोळ होण्याआधी येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी आहे.

Web Title: Khasra Depot in Alpelli is unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.