एसटी कल्याण समितीने केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:03 AM2018-04-22T01:03:40+5:302018-04-22T01:03:40+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने शनिवारी आरमोरी तालुक्याचा दौरा केला. देऊळगाव, ठाणेगाव व आरमोरी येथील विविध ठिकाणी भेटी देऊन सोईसुविधांची पाहणी केली.

The investigation by the ST Welfare Committee | एसटी कल्याण समितीने केली पाहणी

एसटी कल्याण समितीने केली पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय सोईसुविधा तपासल्या : नागरिकांशी संवाद साधून विविध बाबींची घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने शनिवारी आरमोरी तालुक्याचा दौरा केला. देऊळगाव, ठाणेगाव व आरमोरी येथील विविध ठिकाणी भेटी देऊन सोईसुविधांची पाहणी केली. उपस्थित अधिकारी व कर्मचाºयांकडून विविध बाबींची माहिती जाणून घेतली.
अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके, समितीचे सदस्य आमदार प्रभूदास भिलावेकर, आमदार संजय पुराम, आमदार पास्कल धनारे, आमदार डॉ. संतोष टारफे यांनी देऊळगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकाला भेट दिली. येथील सोयीसुविधांची पाहणी करून निवासस्थान दुरूस्तीचे काम न्याहाळले. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाची पाहणी करून लाभार्थ्यांची चर्चा केली. ठाणेगाव येथे भेट देऊन ३०५४ योजनेंतर्गत आदिवासी उपयोजनामधून ठाणेगाव-ठाणेगाव टोली या रस्ता दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर समितीने आरमोरी येथील प्रिती माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन तेथील सोयीसुविधा, भोजन व्यवस्था व परिसराची पाहणी केली. आश्रमशाळेतील कर्मचारी पदभरतीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. येथील भोजन व्यवस्थेची पाहणी केली. उपस्थित असलेल्या रूग्णांशी चर्चा केली. शस्त्रक्रिया गृहालाही भेट देऊन पाहणी केली. येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली.
नागरिकांनी वाचला रूग्णालयातील समस्यांचा पाढा
आरमोरी उपजिल्हा रूग्णालयाला अनुसूचित जमाती कल्याण समितीने भेट दिल्यानंतर येथील अनेक नागरिकांनी समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्षांसमोर रूग्णालयातील विविध गैरसोयी व इतर समस्यांचा पाढा वाचला. रिक्त पदांमुळे या रूग्णालयाच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांनी समितीच्या सदस्यांना सांगितले. येथील डॉक्टर रूग्णांना परिपूर्ण व योग्य सेवा देत नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली. येथील समस्या सोडविण्याची मागणी केली.
वडसात वसतिगृह व इतर कामांची पाहणी
देसाईगंजात दाखल झालेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी तालुक्यातील शासकीय वसतिगृह व विविध कामांची प्रत्यक्ष मोका चौकशी करून पाहणी केली. दरम्यान समितीने तालुक्यातील कुरूड येथे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ठाकूर तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची पाहणी व चौकशी केली.
देसाईगंजपासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोकुलनगर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. देसाईगंज येथील नामांकित विद्यालयाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगरसेवक राजू जेठाणी आदी उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: The investigation by the ST Welfare Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.