शहरातून जाणारा महामार्ग झाला अरूंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:50 PM2018-12-12T23:50:01+5:302018-12-12T23:51:10+5:30

गडचिरोली शहरातून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांची रूंदी इतर ठिकाणच्या महामार्गापेक्षा कमी करण्यात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र हा मार्ग शहरातही चौपदरीच राहणार असून एका बाजुच्या रस्त्यावरून एकावेळी दोन वाहने सहज जाऊ शकतील, .....

The highway leading to the city becomes narrow | शहरातून जाणारा महामार्ग झाला अरूंद

शहरातून जाणारा महामार्ग झाला अरूंद

googlenewsNext
ठळक मुद्दे चौपदरी असूनही कोंडीची शक्यता : भविष्यात समस्या वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांची रूंदी इतर ठिकाणच्या महामार्गापेक्षा कमी करण्यात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र हा मार्ग शहरातही चौपदरीच राहणार असून एका बाजुच्या रस्त्यावरून एकावेळी दोन वाहने सहज जाऊ शकतील, असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
हा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजुने १५-१५ मीटर आहे. त्यात मध्यभागी रस्ता दुभाजक नाही, पण दोन्ही बाजूने असणाºया नालीत ३.५ मीटर रस्ता जाणार आहे. हा रस्ता गडचिरोली शहरात मात्र मध्यभागापासून दोन्ही बाजुने १२-१२ मीटरच राहणार आहे. त्यात दोन्ही बाजूची नाली मिळून ३.५ मीटर तर मधातील रस्ता दुभाजकासाठी २.५० मीटर जागा जाणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजुने नाली व रस्ता दुभाजक सोडून ९-९ मीटरचाच रस्ता शिल्लक राहणार आहे. या रस्त्यावरून एका बाजुने दोन वाहने जाऊ शकत असली तरी भविष्याचा विचार करता ही रूंदी अपुरी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यासंदर्भात महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडे विचारणा केली असता भूमी अभिलेखच्या रेकॉर्डनुसार शहरातून जाणाºया महामार्गाची (एका बाजुची) रूंदी १२ मीटरच आहे. त्यामुळे इतर महामार्गाप्रमाणे १५ मीटर जागा मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
गडचिरोली शहरात होणाºया या अरूंद महामार्गामुळे आणि भविष्यात त्यावर अतिक्रमण झाल्यास वाहतुकीची कोंडी आणि अपघात वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

बायपास मार्गासाठी सर्वेक्षण
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून जड वाहनांची वाहतूक झाल्यास कोंडी निर्माण होईल. शिवाय अपघाताची शक्यताही बळावते. त्यामुळे जड वाहनांसाठी शहराच्या बाहेरून बायपास मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण झाले असून त्या कामाला मंजुरी मिळायची बाकी आहे. भविष्यात तो मार्ग झाल्यास शहरातील बरीच वाहतूक तिकडे वळती होईल.

Web Title: The highway leading to the city becomes narrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.