अंगणवाड्या होणार हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:40 PM2019-03-25T22:40:55+5:302019-03-25T22:41:33+5:30

अंगणवाडीची माहिती आॅनलाईन सादर करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट फोन दिला जाणार आहे.

Hi-tech at Anganwadar | अंगणवाड्या होणार हायटेक

अंगणवाड्या होणार हायटेक

Next
ठळक मुद्देप्रत्येक नोंद होणार आॅनलाईन : २३७८ अंगणवाड्यांना मिळणार स्मार्ट फोन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अंगणवाडीची माहिती आॅनलाईन सादर करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट फोन दिला जाणार आहे.
प्रशासनाच्या कारभाराला गती देण्यासाठी शासन आॅनलाईन माहितीवर विशेष भर दिले जात आहे. मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यापासून त्यांचे आरोग्य व पोषण आहार उपलब्ध करून देण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडीकडून पार पाडली जाते. विविध विभागामार्फत अंगणवाडी सेविकेला माहिती मागितली जाते. या सर्व माहितीची रजिस्टरवर नोंद केली जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बराचसा वेळ माहिती भरण्यामध्येच जात होता. अंगणवाडी कर्मचारी सततच्या माहितीमुळे त्रस्त झाले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वेळ वाचून त्यांना बालकांच्या शिक्षण व आरोग्याकडे लक्ष देता यावे, यासाठी शासनाने प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ७७१ अंगणवाड्या, ५१८ मिनी अंगणवाड्या, ८९ नागरी भागातील अंगणवाड्या अशा एकूण २ हजार ३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. माहिती भरण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने स्वतंत्र अ‍ॅप तयार केला आहे.
लसीकरण, गृहभेट याबाबतचा दरदिवशीचा रिपोर्ट व इतर माहिती भरता येणार आहे. वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे. मोबाईलचा खर्च म्हणून प्रत्येकी तीन महिन्याला ४०० रूपये दिले जाणार आहेत.
सततची माहिती भरण्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आजपर्यंत त्रस्त होत्या. अ‍ॅप उपलब्ध झाल्याने माहिती भरण्याच्या त्रासापासून त्यांची मुक्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने एक महिन्यापूर्वी घेतला आहे. प्रत्येक जिल्हास्तरावरून किती मागणी आहे. याची माहिती मागविण्यात आली होती. मात्र अजुनपर्यंत स्मार्ट फोन उपलब्ध झाले नाही.
इंटरनेटच्या गंभीर समस्येचे काय?
गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ३० टक्के भागातच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यातही बहुतांश ठिकाणी टू-जी सेवा असल्याने इंटरनेट व्यवस्थित काम करीत नाही. स्मार्टफोनसाठी इंटरनेटची स्पीड अधिक असणे आवश्यक आहे. शिक्षण, रोहयो व इतर विभागांनी आॅनलाईन माहिती सादर करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार केले. मात्र दुर्गम भागात इंटरनेट काम करीत नसल्याने ते कर्मचारी कमालीचे त्रस्त आहेत. हाच कटूअनुभव अंगणवाडी कर्मचाºयांनाही येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Hi-tech at Anganwadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.