भाजपचे ग्राम स्वराज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:44 AM2018-04-16T01:44:19+5:302018-04-16T01:44:19+5:30

स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे.

Gram Swaraj campaign of BJP | भाजपचे ग्राम स्वराज अभियान

भाजपचे ग्राम स्वराज अभियान

Next
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांची बैठक : ५ मे पर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे. हे अभियान ५ मे पर्यंत राबविले जाणार आहे.
१८ एप्रिलला स्वच्छ भारत पर्व अंतर्गत प्रत्येक गावात स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गावासाठी प्रचार, प्रसार, हागणदारीमुक्त गाव सर्वेक्षण करून सूचि/यादी प्रसिद्ध करणे, जनजागृती करणे, शौचालय बांधकामाला गती देणे, २० एप्रिलला उज्ज्वला पंचायत होईल. या अंतर्गत गॅस कनेक्शन वितरण मेळावा तसेच पात्र ग्राहकांची नोंदणी करून अभियानाची जागृती केली जाईल. २४ एप्रिलला पंचायती राज दिवस पाळला जाईल. या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन टीव्हीवर थेट दाखविण्यात येईल. याकरिता गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करून संबोधन ऐकविले जाईल. २८ एप्रिलला ग्रामशक्ती अभियान राबविले जाईल. या अभियानांतर्गत मागास गावात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सौभाग्य योजना, जनधन, स्वास्थ्य सुरक्षा मिशन, जीवनज्योती, मातृवंदना योजना आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन केले जाईल. ३० एप्रिलला आयुष्यमान भारत अभियानांतर्गत ग्राम पंचायतींमध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन व आरोग्य योजनांची माहिती दिली जाईल. २ मे ला किसान कल्याण कार्यशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, ५ मे ला आजिविका व कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पंतप्रधानांचे थेट संबोधन नागरिकांना ऐकविले जाईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी सर्किट हाऊसमध्ये आयोजित बैठकीत दिली.
यावेळी आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे, भारत खटी, कुथे, विलास गावंडे, स्वप्नील वरघंटे, प्रकाश गेडाम, दामोधर अरीगेला यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Gram Swaraj campaign of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा