रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:13 PM2018-07-16T23:13:36+5:302018-07-16T23:13:58+5:30

दुधमाळा परिसरातील वीज पुरवठा नेहमी खंडीत होत असल्याने दुधमाळावासीय त्रस्त झाले आहेत. याबाबतचे निवेदन देण्यासाठी गावकरी महावितरणचे धानोरा येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, ते अनुपस्थितीत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले.

Given statement to the vacant chair | रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन

रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन

Next
ठळक मुद्देवीज पुरवठ्याची समस्या : दुधमाळातील नागरिक महावितरणमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : दुधमाळा परिसरातील वीज पुरवठा नेहमी खंडीत होत असल्याने दुधमाळावासीय त्रस्त झाले आहेत. याबाबतचे निवेदन देण्यासाठी गावकरी महावितरणचे धानोरा येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, ते अनुपस्थितीत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले.
दुधमाळा येथील वीज पुरवठा मागील १५ दिवसांपासून सातत्याने खंडीत होत आहे. रात्री ७ वाजतादरम्यान वीज खंडीत होते. त्यानंतर रात्रभर वीज पुरवठा सुरळीत होतच नाही. याबाबत संबंधित शाखा अभियंत्याला फोन केल्यास ते उडवाउडवीचे उत्तरे देतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर नागरिकांना शिविगाळ करतात. येथील लाईनमन कधीच मुख्यालयी राहत नाही. फोन तर कधीच उचलत नाही. विद्युत सेवा चांगली पुरवायची असेल तर शाखा अभियंता व लाईनमन यांची बदली करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. निवेदनावर अक्षय पेद्दीवार, आशिष उईके, वैभव गावतुरे, श्रीकांत शेडमाके, पंकज शेडमाके, प्रमोद कुमरे, नुरज जंबेवार, सुखदेव वाकोडे यांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Given statement to the vacant chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.