गडचिरोलीत चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:35 PM2017-10-28T16:35:33+5:302017-10-28T16:38:57+5:30

गडचिरोली व देसाईगंज तालुक्यात पोलिसांनी अवैधपणे दारू वाहतूक करणाऱ्यावर केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा पकडला. दोन्ही वाहने जप्त करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Gadchiroli police seized domestic and foreign liquor worth Rs 4 lakh | गडचिरोलीत चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त

गडचिरोलीत चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त

Next
ठळक मुद्देदोन वाहनेही जप्तगडचिरोली ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : गडचिरोली व देसाईगंज तालुक्यात पोलिसांनी अवैधपणे दारू वाहतूक करणाऱ्यावर केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा पकडला. दोन्ही वाहने जप्त करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
शुक्रवारच्या रात्री पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात गडचिरोली ठाण्याचे निरीक्षक संजय सांगळे व एसडीपीओ कार्यालयातील पोलीस हवालदार राजेंद्र तितीरमारे, विजय राऊत, नापोशि दीपक डोंगरे, हवालदार नरूले, राऊत यांनी आरमोरी मार्गावरील खरपुंडीजवळ सापळा रचला. त्यात टाटा इंडिगो कार (एमएच ३१, सीएन ६३७८) हे वाहन संशयास्पदरित्या आढळल्यानंतर सिनेस्टाईल पाठलाग करून त्या वाहनाची तपासणी केली. त्यात इम्पेरियल ब्लू या कंपनीच्या १२ पेट्या (प्रतिपेटी १८० मिलीच्या ४८ निप) व्हिस्की आढळली. त्या ५७६ सीलबंद निपचा गडचिरोलीतील विक्री किमतीनुसार (३०० रुपये प्रति निप) १ लाख ७२ हजार रुपये किमतीची दारू अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचे आढळले. याप्रकरणी आरोपी अरुण केशव अष्टणकर रा.खरबी, पो.हुडकेश्वर ता.गडचिरोली याच्याविरूद्ध कलम ६५ (ई), ९८ (क) मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसºया कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे केलेल्या कारवाईत देसाईगंज ते अर्जुनी मार्गावर सापळा रचून बेकायदेशिरपणे दारू वाहतूक करणाºया मारूती स्विफ्ट (एमएच ३१, सीएन ४८२०) या वाहनाला थांबविले. यावेळी चालकाच्या बाजुला बसून असलेला इसम सुरज पत्रे रा.गांधी वार्ड, देसाईगंज हा पळून जाण्यात यशस्वी झाला. वाहनचालक दिलीप आशन्ना कुचलकार रा.आंबेडकर वार्ड, देसाईगंज याला ताब्यात घेऊन वाहनातील दारूसाठा जप्त केला. त्यात देशी दारू सुप्रिम नंबर १ या कंपनीच्या ९० मिलीच्या २८०० सीलबंद निप, १८० मिलीच्या १९२ निप, रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या ४०० निप, इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १११ निप असा अडीच लाखांचा दारूसाठा तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली. ही कार देसाईगंज येथील दारू पुरवठादार गुरूबचसिंग मक्कड याच्या मालकीची आहे. या तिघांवरही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निपीक्षक प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊराव बोरकर, नरेश सहारे, दुधराम चवारे, चंदू मोहुर्ले, प्रशांत पातकमवार यांनी केली.

Web Title: Gadchiroli police seized domestic and foreign liquor worth Rs 4 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा