भर उन्हात उभे राहून ऐकावा लागणार निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:42 PM2019-05-22T23:42:53+5:302019-05-22T23:43:20+5:30

इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रातील मतांची मोजणी लवकर होत असल्याने सकाळी ९ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल बाहेर येण्याची शक्यता आहे. प्रत्येक फेरीनंतर निकाल जाहीर होईल. त्यामुळे निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. परंतू त्यांना निकाल ऐकण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या आवाराबाहेर, म्हणजे अगदी चंद्रपूर मार्गावरच उभे राहावे लागणार आहे.

Fill in the sunlight and listen to the results | भर उन्हात उभे राहून ऐकावा लागणार निकाल

भर उन्हात उभे राहून ऐकावा लागणार निकाल

Next
ठळक मुद्देनिकाल ऐकण्यासाठी येणाऱ्यांचे होणार हाल। लाऊडस्पीकरवरून जाहीर होणार प्रत्येक फेरीचा निकाल

गडचिरोली : इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रातील मतांची मोजणी लवकर होत असल्याने सकाळी ९ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल बाहेर येण्याची शक्यता आहे. प्रत्येक फेरीनंतर निकाल जाहीर होईल. त्यामुळे निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. परंतू त्यांना निकाल ऐकण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या आवाराबाहेर, म्हणजे अगदी चंद्रपूर मार्गावरच उभे राहावे लागणार आहे.
भर दुपारी उन्हाचे चटके खात निकाल ऐकणाºया नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था नाही.

१४ टेबलवर चालेल काम
कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत दोन माळ्यांवरील वेगवेगळ्या हॉलमध्ये एकाचवेळी १४ टेबलवर मतमोजणीचे काम चालणार आहे.
सकाळी ८ वाजता पोस्टल बॅलेटने मतमोजणीला सुरूवात होईल. त्यानंतर ८.३० वाजता ईव्हीएममधील मतमोजणीला सुरूवात होईल. एकूण २५ फेºया होतील.
सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत मतदारांचा कौल कोणाकडे आहे, याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल, परंतु अंतिम निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Fill in the sunlight and listen to the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.