तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:55 PM2018-10-05T23:55:36+5:302018-10-05T23:55:40+5:30

तालुक्यातील डोणवाडा येथील आदिवासी समाजाकडून गावाजवळचे अवैद्य ब्लास्टिंग करून दगडाचे होणारे उत्खनन थांबविणे, गायरान व वन हक्क जमिनीवरील घरांना ग्रामपंचायत नमुना नंबर ८ मिळवून देणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आदिवासी समाजबांधव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ३ आॅक्टोबर पासून उपोषण बसले आहेत. तिसºया दिवशी उपोषण सुरूच होते.

 Fasting on the third day continued | तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यातील डोणवाडा येथील आदिवासी समाजाकडून गावाजवळचे अवैद्य ब्लास्टिंग करून दगडाचे होणारे उत्खनन थांबविणे, गायरान व वन हक्क जमिनीवरील घरांना ग्रामपंचायत नमुना नंबर ८ मिळवून देणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आदिवासी समाजबांधव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ३ आॅक्टोबर पासून उपोषण बसले आहेत. तिसºया दिवशी उपोषण सुरूच होते.
डोणवाडा येथील आदिवासी समाजाची गायरान व हक्क जमिनीवरील कुडाणाची व कच्च्या झोपड्या असलेल्या घराची जवळपास ८०० लोकसंख्येची वस्ती आहे. वस्तीजवळच अवैध ब्लास्टिंग करून दगडाचे उत्खनन होत असून या ब्लास्टिंगमुळे मानवी वस्तीत मोठे दगड येऊन पडत आहेत. त्यामुळे प्राणी व मुलाबाळांनासह माणसांच्या जीवित्तास धोका असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळोवेळी मंडळाधिकारी, पोलीस प्रशासनास निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने २१ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निवेदन दिले होते. परंतु अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने ३ आॅक्टोबर पासून आदिवासी समाजबांधवांनी उपोषण सुरू केले आहे. अवैध ब्लास्टिंग थांबविणे, घराची नोंद ग्रामपंचायतला करून नमुना नंबर ८ देणे, वन हक्क व गायरान मध्ये अतिक्रमण केलेल्या जमिनीच्या सातबारावर नोंद घेणे, डोणवाडा येथील गट क्र. ७२ च्या सातबारा आॅनलाइन करणे, यासह विविध मागण्यांची पुर्ततेसाठी उपोषण केले जात आहे.

Web Title:  Fasting on the third day continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.