नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:44 PM2019-03-25T22:44:48+5:302019-03-25T22:45:59+5:30

कुटुंबाचे भरण-पोषण करण्याकरिता शेतकरी पूर्वी निर्वाहापुरती शेती करीत होता. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात बराच बदल झाला. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांचा दृष्टिकोनही बदलला आहे. अनेक शेतकरी हमखास उत्पन्न देणाºया पिकांची लागवड करीत आहेत. जिल्हह्यात अशा शेतीची संकल्पना दिवसेंदिवस दृढ होऊन ती अनेक शेतकऱ्यांमध्ये रुजत आहे.

Farmers' tendency to cash crops | नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

Next
ठळक मुद्देनिर्वाहाच्या शेतीला बगल : कलिंगड, खरबूज, कारले, काकडी, मका लागवडीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुटुंबाचे भरण-पोषण करण्याकरिता शेतकरी पूर्वी निर्वाहापुरती शेती करीत होता. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात बराच बदल झाला. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांचा दृष्टिकोनही बदलला आहे. अनेक शेतकरी हमखास उत्पन्न देणाºया पिकांची लागवड करीत आहेत. जिल्हह्यात अशा शेतीची संकल्पना दिवसेंदिवस दृढ होऊन ती अनेक शेतकऱ्यांमध्ये रुजत आहे.
कृषी विकासाच्या दृष्टीने शासनाने विविध योजना राबविण्यास प्राध्यान्य दिल्या ने अनेक शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करीत आहेत. शेतकºयांना अनुदानावर बी-बियाणे, यंत्र, अवजारे तसेच विविध साहित्य दिले जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबिन पिकाची लागवड केली जाते. या पिकांचे उत्पन्न डिसेंबर-नोव्हेंबर महिन्यात निघाल्यानंतर भाजीपाला व फळभाज्यांची लागवड शेतकरी करतात. तर बहुतांश शेतकरी कलिंगड, खरबूज, कारले, काकडी, मका आदी नगदी पिकांची लागवड करतात. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्याने सिंचनाची सोय करून ही पिके शेतकºयांना सहज शक्य होते. याशिवाय आरमोरी तालुक्यातील वैरागड, मानापूर, देलनवाडी, सुकाळा, मोहझरी व कुरखेडा तालुक्यातील कढोली उराडी, घाटी परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामानंतर शेतकरी भूईमुगाची लागवड करतात. हा परिसर या पिकासाठी एकमेव परिसर आहे. खोब्रागडी व वैलोचना नदीच्या काठावरील शेतांमध्ये हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. याशिवाय भाजीपाला व फळभाजी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी शेतकरी ही विशेष शेती करीत आहेत.
नदीचे पात्र व काठावरील भाग पिकांसाठी फायदेशीर
दशकापूर्वी बाहेरून आलेले व्यावसायिक जिल्ह्यात ठेका पद्धतीने जमीन घेऊन कलिंगडाची लागवड करीत होते. परंतु आता जिल्हाभरात बऱ्याच ठिकाणी शेतकरी स्वत: कलिंगडाची लागवड करतात. तसेच वैनगंगा, खोब्रागडी, कठाणी, वैलोचना नदीपात्रात व खरबुजाची लागवड शेतकरी करीत आहे. सध्या हे पीक निघण्यास सुरूवात झाली आहे. यातूनही बराच नफा मिळतो.
कारले व काकडी लागवडीतून भरघोस नफा
अनेक समारंभात भाजीपाला व फळभाज्यांची मागणी असते. तसेच बाहेरही निर्यात होत असते. देसाईगंज तालुक्यातील मोहटोला, किन्हाळा व गडचिरोली तालुक्यातील जेप्रा, राजगाटा परिसर कारले लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय उसेगाव, आंबेशिवणी परिसरात काकडीची लागवड शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात केली आहे. यांतून शेतकरी भरघोस नफा मिळवतात.
मका पिकाचा आवाका वाढला
जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी उन्हाळ्यात शेतीला पाण्याची सोय नसल्याने शेतकरी मका पीक घेण्यास धजत नव्हते. परंतु आता बऱ्याच ठिकाणी सिंचनाची सोय झाल्याने शेतकरी मक्याची लागवड करीत आहेत. सिरोंचा, मुलचेरा, देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी, गडचिरोली तालुका यात आघाडीवर आहे.

Web Title: Farmers' tendency to cash crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.