शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:24 AM2018-10-17T01:24:42+5:302018-10-17T01:26:18+5:30

स्वत:चे उत्पन्न दुप्पट करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अशोक चौैधरी यांनी केले.

Farmers should turn to the supermarket | शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे

शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे

Next
ठळक मुद्देअपर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : गणेशपूर येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वत:चे उत्पन्न दुप्पट करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अशोक चौैधरी यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, कृषी विभाग, आत्मा आणि पशुसंवर्धन विभाग अंतर्गत २ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर या कालावधीत २५ गावांमध्ये कृषी कलयाण अभियान-२ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जाणीव जागृती करण्यासाठी आरमोरी तालुक्यातील गणेशपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अशोक चौधरी मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे, तहसीलदार यशवंत धाईत, विषय विशेषज्ज्ञ पुष्पक बोथीकर, सुमित धावरे, डॉ.आर.एस.वाघमारे, तालुका कृषी अधिकारी एस.पी.ढोणे, डॉ.व्ही.व्ही.उदे, व्ही.डी.रहांगळे आदी उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांनी शेतीला जोड म्हणून पुरक व्यवसाय कुकुटपालन, फलोत्पादन, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करावी, गाव पातळीवर शेती उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले.
संदीप कऱ्हाळे यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, कम्पोस्ट यांचा वापर करण्याचे आवाहन केले. उत्पनात वाढ घडवून आणण्याकरिता तेलवर्गीय पिकांचे उत्पादन करावे, असे सांगितले. शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळ पिकांकडे वळावे, असेही आवाहन केले. अनंत पोटे यांनी शेतीचे उत्पादन वाढविण्याकरिता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ.प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण करून घ्यावे, आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी, उत्पादनात वाढ आणि अधिक मोबदला मिळण्याकरिता सेंद्रिय शेतीचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. पुष्पक बोथीकर यांनी विविध पिकांवर येणारे कीड व रोगांचे व्यवस्थापन, कीटकनाशकांची हाताळणी याविषयी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांनी कृषी विभागामार्फत प्राधिनिधीक स्वरूपात कृषी निविष्ठांचे वाटप करावे, असे आवाहन केले.
प्रशिक्षणादरम्यान प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना कृषीनिविष्ठांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Farmers should turn to the supermarket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी