सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:51 AM2018-06-06T01:51:27+5:302018-06-06T01:51:27+5:30

शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन विद्यमान केंद्र व राज्य सरकारमधील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन हवेत विरले. विद्यमान सरकारकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप काँग्रेसच्या आदिवासी कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केले.

Farmers fraud by government | सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

Next
ठळक मुद्देमाजी आमदारांचा आरोप : कोंढाळात काँग्रेसच्या बुथ कमिटीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन विद्यमान केंद्र व राज्य सरकारमधील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन हवेत विरले. विद्यमान सरकारकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप काँग्रेसच्या आदिवासी कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केले.
तालुक्यातील कोंढाळा येथे काँग्रेसच्या बुथ कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैैठकीला युकाँचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, ग्रा.पं. सदस्य गजानन सेलोटे, प्राचार्य भाऊराव पत्रे, सीताराम धोटे, नितीन राऊत, अरूण कुंभलवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आ. गेडाम यांनी भाजप सरकारच्या शेतकरी, शेतमजूर विरोधी धोरणाबाबत नाराजी व्यक्त करून विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना वाºयावर सोडले, असे सांगितले. याप्रसंगी कोंढाळा व परिसरातील काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Web Title: Farmers fraud by government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी