अहेरीतून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:50 AM2018-01-18T00:50:01+5:302018-01-18T00:50:17+5:30

येथील वृंदावन धामच्या भव्य पटांगणात भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेतर्फे अहेरी तालुक्यातील ११ गरजू शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणाहून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ करण्यात आला.

Farmers from Aheri start the Jagar yatra | अहेरीतून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ

अहेरीतून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देउपविभागातील ११ शेतकऱ्यांना बैलजोडी वाटप : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : येथील वृंदावन धामच्या भव्य पटांगणात भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेतर्फे अहेरी तालुक्यातील ११ गरजू शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणाहून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी जागर यात्रेचे विदर्भ प्रमुख हरीष हरकडे होते. प्रमुख अतिथी म्हणूम बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, अजय निलदावार, संजय एकापुरे, किसान संघाचे प्रांत मंत्री उदय बोर्रावार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रोडमल गडलोत, विश्व हिंदू परिषदेचे अहेरी जिल्हाध्यक्ष सीताराम सोनानीया, महामंत्री अमित बेझलवार, व्यापारी संघटनेचे कन्हयालाल रोहरा, शंकरजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संजय एकापुरे म्हणाले, शेतकरी बांधवामध्ये कृषीधर्म जागृत करण्यासाठी सदर जागरयात्रा काढण्यात आली असून ही यात्रा अहेरी येथून विदर्भातील अनेक ठिकाणी पोहोचणार आहे. शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतात, मात्र आज शेतकºयांची दैनावस्था झाली आहे. शेतात घातक विषारी रसायनाचा वापर अधिक वाढला आहे. कीटकनाशकाच्या अधिक फवारणीमुळे पिकातील जैविक तंत्र बिघडले आहे. गोवंशाचा वापर दूध आणि मांस या साठीच झालेला आहे. शेतकरी या आत्मघातकी धोरणांना बळी पडल्याने आत्महत्या, गोहत्या, दूषित अन्नधान्य सेवनामुळे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ही शेतकरी जागरयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
जैविक शेती कमीत कमी लागतची असून जास्त उत्पन्न देणारी ठरत आहे. तरी याला लागणारे खत व कीटकनाशके हे गोवशांच्या शेण व गोमूत्र यापासून घरच्या घरी तयार करणे सुलभ झाले आहे. विदर्भातील शेतकरी या रसायनमुक्त शेतीचा वापर करावा. गोवशांपासून (पंचगव्या) प्राप्त विविध खत कीटकनियंत्रके, साबण, धूप, अर्क, मंजन, मच्छर अगरबत्ती आदीसह विविध पदार्थ व इतर औषधी तयार करण्यासाठी शेतकºयांनी प्रवृत्त व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सदर शेतकरी जागार यात्रेसोबत डिजिटल रथ राहणार असून देवलापार व अकोला जिल्ह्याच्या म्हैसूर येथील आदर्श गो-सेवा केंद्राने सहकार्य केले आहे.
यात्रेदरम्यान अहेरी उपविभागातील अतिदुर्गम भागातील ११ गरजू शेतकऱ्यांना लकी ड्रा पद्धतीने बैलजोडीचे वाटप करण्यात आले. या यात्रेची सुरुवात पारंपरिक आदीवासी नृत्याने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार पूर्वा दोन्तुलवार यांनी केले. यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल चे अमित बेझलवार, रवी नेलकुद्री, देवेंद्र खतवार, पवन दोंतुलवार, संतोष अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
वर्धा येथे होणार समारोप
विहिपतर्फे विदर्भात दोन शेतकरी जागर यात्रा निघणार असून अतिदुर्गम अहेरी आणि सिंदखेड राजा येथून यात्रेचा शुभारंभ होणार आहे. सदर यात्रा १० दिवसात २ हजार ५५१ किमी चा प्रवास करणार असून २६ जानेवारीला महात्मा गांधी व विनोबा भावे याची कर्मभूमी वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

Web Title: Farmers from Aheri start the Jagar yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.