नाकेबंदीने वाहनधारक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:08 PM2018-07-18T23:08:22+5:302018-07-18T23:08:42+5:30

अवैधरित्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोख लावण्याच्या उद्देशाने कोरची पोलीस ठाण्यातर्फे मंगळवारी कोरची-देवरी या मुख्य मार्गावर जवळपास दीडतास नाकेबंदी करून शेकडो वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

Failure of vehicleholder with blockade | नाकेबंदीने वाहनधारक धास्तावले

नाकेबंदीने वाहनधारक धास्तावले

Next
ठळक मुद्देरांगा लागल्या : कोरची-देवरी मार्गावर वाहनांची कसून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : अवैधरित्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोख लावण्याच्या उद्देशाने कोरची पोलीस ठाण्यातर्फे मंगळवारी कोरची-देवरी या मुख्य मार्गावर जवळपास दीडतास नाकेबंदी करून शेकडो वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या या नाकेबंदी व तपासणी मोहिमेमुळे जड वाहतूक करणाºया अनेक वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
नाकाबंदी दरम्यान कोरची ते देवरी या मुख्य मार्गावर दोन्ही बाजूला चारचाकी व दुचाकी वाहनांची लांबच्या लांब रांग लागली होती. कोरची पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाºयांनी आपल्या सोबत पाटील, मसराम, बारसागडे, उईके, मेश्राम आदी कर्मचाºयांना घेऊन ही मोहीम राबविली. मोहिमेदरम्यान दुचाकी, चारचाकी, ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. शिवाय वाहन चालक परवाना, वाहनांचे दस्तावेज आदींबाबतही पोलीस अधिकाºयांनी खातरजमा केली.
सोमवारच्या रात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. अशा भर पावसात कोरचीच्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली. अशा प्रकारच्या नाकेबंदीची अहेरी उपविभागासह गडचिरोली उपविभागात गरज आहे. यातून दारू वाहतुकीला आळा बसू शकतो.

Web Title: Failure of vehicleholder with blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.