आदर्श गावासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:18 AM2018-01-21T00:18:05+5:302018-01-21T00:18:17+5:30

गावाचा विकास करण्यासाठी संपूर्ण नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी गावाच्या विकासासाठी स्वत:ची जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.

 Everyone should take the initiative for the ideal village | आदर्श गावासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

आदर्श गावासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे प्रतिपादन : पारडी महोत्सव २०१८ चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
पारडी : गावाचा विकास करण्यासाठी संपूर्ण नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी गावाच्या विकासासाठी स्वत:ची जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
गडचिरोली तालुक्यातील पारडी येथे ‘पारडी महोत्सव २०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख बोलत होते.
महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, आदर्श ग्राम राजगडचे सरपंच चंदू मारकवार, जिल्हा परिषद सदस्य वर्षा कौशिक, जगन्नाथ बोरकुटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, शालिक धनकर, आत्माच्या उपसंचालिका हिरडकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अमरशेट्टीवार, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी पचारे, विधाते, सरपंच संजय निखारे, माजी उपसभापती केदारनाथ कुंभारे, चंद्रशेखर जक्कनवार, वसंतराव म्हशाखेत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार उत्पादन घेणाºया शेतकºयांचे इतर शेतकºयांनी अनुकरण करावे. गावातील हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व हायमास्ट लाईट लावण्यासाठी पोलीस विभागातून तीन लाख रूपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना पारडी गाव आदर्श बनविण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यातील इतर गावांना आदर्शवत वाटेल, अशा पध्दतीने गावाचा विकास करावा, असे मार्गदर्शन केले. पारडी येथील मुख्य रस्त्याचे रूंदीकरण करण्याची मागणी पारडीवासीयांनी मागील अनेक वर्षांपासून केली आहे. या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.
आदर्श ग्राम राजगडचे सरपंच चंदू मारकवार म्हणाले, संत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचा आदर्श समोर ठेवून गावकºयांनी आदर्श ग्राम बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गावकºयांना केले. पारडी गाव आदर्श गाव बनविण्याची प्रतिज्ञा सुध्दा देण्यात आली.
प्रास्ताविकादरम्यान पारडीचे सरपंच संजय निखारे म्हणाले, पदाधिकारी व अधिकारी जोपर्यंत गावपातळीपर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत त्यांना गावातील समस्या कळणार नाही. अधिकारी, पदाधिकारी व ग्राम पातळीवरील पदाधिकारी यांच्या समन्वयातून विकास कामांना चालना मिळेल, असे प्रतिपादन केले.
संचालन चुधरी तर आभार ग्रामसेवक मारगाये यांनी मानले. कार्यक्रमाला उपसरपंच अशोक सोनुले, संदीप निकुरे, ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर आत्राम, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरूदास सोनुले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश कोसरे, मून, किशोर गेडाम, चंद्रशेखर मुरतेली, राजू मुनघाटे, नेताजी लोंढे, शंकर कुंभारे, टीकाराम रायपुरे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
गावात उत्पादित मालाचे प्रदर्शन
पारडी येथील काही प्रयोगशील शेतकºयांनी धान पिकाबरोबरच बांबू लागवड, सूबाभूळ, साग, निंबू, निलगिरी, आंबा लागवड भाजीपाल्याचे उत्पादन करण्यास सुरूवात केली आहे. या सर्वांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय, मच्छीपालन, संकरीत जर्शीगाय, कुक्कुटपालन, मोती संवर्धन यांचे सुध्दा स्टॉल लावण्यात आले होते. महोत्सवासाठी आलेल्या दुसºया गावातील नागरिकांना स्टॉल बाबतची माहिती दिली जात होती. पारडीवासीयांच्या या प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील इतर शेतकºयांना शेतीतील नाविण्यपूर्ण उपक्रम माहित होण्यास मदत झाली.
उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लाईनमन राजकुमार हेलवडे व आरोग्य सेविका चंपा उईके यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  Everyone should take the initiative for the ideal village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.