महिनाभरात विद्यापीठाच्या संपूर्ण जमिनीचे अधिग्रहण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:25 AM2018-12-11T00:25:11+5:302018-12-11T00:25:49+5:30

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला १०० एकर जागेची आवश्यकता आहे. सदर जमीन खरेदीसाठीचा निधी विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांच्या खासगी मालकीची जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया हातात घेण्यात आली आहे.

The entire land of the university will be acquired within a month | महिनाभरात विद्यापीठाच्या संपूर्ण जमिनीचे अधिग्रहण होणार

महिनाभरात विद्यापीठाच्या संपूर्ण जमिनीचे अधिग्रहण होणार

Next
ठळक मुद्देप्रशासनाच्या हालचाली वाढल्या : शेतकऱ्यांकडून जमिनीचे दस्तऐवज घेण्यास प्रारंभ; संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व्यस्त

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला १०० एकर जागेची आवश्यकता आहे. सदर जमीन खरेदीसाठीचा निधी विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांच्या खासगी मालकीची जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया हातात घेण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यापीठाच्या नावाने ३५ एकर जागा झाली आहे. उर्वरित ६५ एकर जमीन येत्या १० जानेवारी २०१९ पर्यंत मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करून या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठीचे नियोजन झाले आहे व त्या दिशेने विद्यापीठासह प्रशासनाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान खासगी शेतजमीन खरेदी करून अधिग्रहण करण्यासाठी संबंधित शेतकºयांचे शेतीजमिनीबाबतचे संपूर्ण दस्तावेज घेण्यास विद्यापीठ प्रशासनाने सुरूवात केली आहे.
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज सध्या कोटगल मार्गावरील इमारतीतून सुरू आहे. विद्यापीठाचा आवाका व कामाचा विस्तार बघता सदर इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे विद्यापीठात विविध कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम व इतर सर्व भौतिक सुविधा निर्माण होण्याच्या उद्देशाने १०० एकर जागेची मागणी लावून धरण्यात आली. यासाठी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून कोट्यवधींचा निधी काही महिन्यांपूर्वीच विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. आरमोरी मार्गावरील गोगाव, अडपल्ली परिसरातील १०० एकर जागा विद्यापीठाने बघितली आहे. यापैकी विद्यापीठ व इतर प्रशासकीय विभागाने मुल्यांकन व अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करून १०० पैकी ३५ एकर जमीन विद्यापीठाने आपल्या खात्यात जमा केली आहे. आता उर्वरित ६५ एकर जमीन १० डिसेंबर २०१९ पर्यंत मूल्यांकन व अधिग्रहणाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडून ही जमीन ताब्यात घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जागेअभावी गडचिरोली येथील विद्यापीठ चंद्रपूर जिल्ह्यात जाऊ नये, अशी आग्रही मागणी गडचिरोली जिल्ह्यातील सिनेट सदस्यांसह शिक्षण संस्था चालकांनी केली आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून मागास गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे आग्रही आहेत. विद्यापीठासाठी आवश्यक असलेल्या जागेचे लवकरात लवकर अधिग्रहण होऊन ही जमीन विद्यापीठाच्या ताब्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकाºयांसह विद्यापीठाने कार्यवाही गतीने हाती घेतली आहे.
१४ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा बैठक
विद्यापीठ प्रशासनाने ३५ एकर खासगी जागेचे मुल्यांकन करून या जमिनीचे अधिग्रहण केले. मात्र सदर अधिग्रहण प्रक्रिया चुकीची झाली असून काही शेतकºयांना विद्यापीठाने त्यांच्या जमिनीसाठी अधिक भाव दिला, असा आक्षेप काही सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या बैठकीत घेतला होता. या आक्षेपाचे निरसन करून सदर भूमीअधिग्रहण प्रक्रिया नियमानुसार व योग्यरित्या करण्यात आल्याचे सांगण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सोमवार १० डिसेंबर रोजी संबंधित सिनेट सदस्य तसेच चौकशी समितीच्या सदस्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, सहायक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, नगर रचनाकार बारई, सहायक दुय्यक निबंधक भाऊ झाडे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, अभियंता दादा अंबागडे उपस्थित होते. दरम्यान या बैठकीतील चर्चेदरम्यान प्रा. प्रमोद शंभरकर, अजय बदकमवार व देवेश कांबळे सिनेट सदस्यांनी मुल्यांकनाबाबतचे काही दस्तावेज मागितले. मात्र हे दस्तावेज वेळेवर उपलब्ध झाले नसल्याने पुन्हा १४ डिसेंबरला बैठक बोलाविली आहे.

Web Title: The entire land of the university will be acquired within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.