प्रत्येक फेरीनंतर वाढत गेला भाजपचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:00 AM2019-05-24T01:00:40+5:302019-05-24T01:03:31+5:30

आपलाच उमेदवार निवडून येणार असा भक्कम दावा करणाऱ्या कार्यकर्ते किंवा उमेदवारांचा जीव प्रत्यक्ष मतमोजणीची वेळ येते त्यावेळी किती अस्वस्थ असतो, याचा प्रत्यय गुरूवारी आला. अतितटीच्या सामन्यात काँग्रेस आणि भाजपकडून विजयाचे दावे केले जात असले तरी कोणाला मताधिक्य मिळेल याची खात्री मनातून कोणालाच नव्हती.

The enthusiasm of BJP has increased after every round | प्रत्येक फेरीनंतर वाढत गेला भाजपचा उत्साह

प्रत्येक फेरीनंतर वाढत गेला भाजपचा उत्साह

Next
ठळक मुद्देमतमोजणीच्या ठिकाणाचे लाईव्ह चित्रण

गडचिरोली : आपलाच उमेदवार निवडून येणार असा भक्कम दावा करणाऱ्या कार्यकर्ते किंवा उमेदवारांचा जीव प्रत्यक्ष मतमोजणीची वेळ येते त्यावेळी किती अस्वस्थ असतो, याचा प्रत्यय गुरूवारी आला. अतितटीच्या सामन्यात काँग्रेस आणि भाजपकडून विजयाचे दावे केले जात असले तरी कोणाला मताधिक्य मिळेल याची खात्री मनातून कोणालाच नव्हती. पण एकदाची निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आणि भाजपच्या गोटात आनंद तर काँग्रेसच्या गोटात नैराश्येचे वातावरण पसरत गेले.
पहिल्या फेरीनंतर...
सकाळी १० वाजतून २० च्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. परंतू सर्वप्रथम या निकालाच्या आघाडीची वार्ता सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार यांनी माध्यम कक्षात येऊन दिली. पहिल्या फेरीतच भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना ८ हजार ८०६ मतांची आघाडी मिळाली होती. पहिल्याच फेरीत एवढी आघाडी मिळाल्याचे पाहून भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले.
दुसºया फेरीनंतर...
काही वेळातच दुसºया आणि तिसºया फेरीचाही निकाल जाहीर झाला. प्रत्येक फेरीत नेते यांचे मताधिक्य वाढतच होते. दरम्यान खासदार नेतेही माध्यम कक्षात दाखल झाले. याचवेळी त्यांना अभिनंदनाचे फोन सुरू झाले.
ठिकठिकाणी जल्लोष
सायंकाळी ५ वाजेपर्यंत १३ फेऱ्यांची मतमोजणी झाली होती आणि नेते ७० हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. ही वार्ता जिल्हाभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये पसरून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करणे सुरू झाले होते. गडचिरोलीत नेते यांच्या कार्यालयासमोरही फटाके फोडण्यात आले. रात्री विजयी मिरवणूक काढण्याची तयारीही करण्यात आली. परंतु निकालच जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले.

दुपारी ३ वाजेपर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य झाल्यामुळे विद्यमान खासदार अशोक नेते यांचे मताधिक्य आता कमी होणार नाही याची खात्री झाली होती. परंतू नेते यांनी जल्लोष करण्यासाठी आपले कार्यालय न गाठता शेवटचा निकाल येईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडले नाही. काँग्रेसचे उमेदवार डॉ.उसेंडी हेसुद्धा पहिल्या फेरीपासून मतदान केंद्रात बसून बुथनिहाय मतांचा आढावा घेत होते.

Web Title: The enthusiasm of BJP has increased after every round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.