घंटानादने कार्यालयांचा परिसर दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:28 AM2018-04-04T01:28:01+5:302018-04-04T01:28:01+5:30

कोरेगाव (भीमा) हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे आदींसह विविध मागण्यांकरिता भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी येथे घंटानाद आंदोलन मंगळवारी करण्यात आले.

Doctor of the office hours | घंटानादने कार्यालयांचा परिसर दणाणला

घंटानादने कार्यालयांचा परिसर दणाणला

Next
ठळक मुद्देगडचिरोली, चामोर्शी, आरमोरीत भारिप-बमसंचे आंदोलन : कोरेगाव भीमा हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/चामोर्शी/आरमोरी : कोरेगाव (भीमा) हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे आदींसह विविध मागण्यांकरिता भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी येथे घंटानाद आंदोलन मंगळवारी करण्यात आले. जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
गडचिरोली - भारिप बमसंचे प्रदेश निरीक्षक रोहिदास राऊत यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी वासनिक यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात भारिप बमसंचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम टेंभुर्णे, महिला आघाडी अध्यक्ष माला भजगवळी, सहसचिव प्रा. राजन बोरकर, प्रकाश रायपुरे, अशोक खोब्रागडे, प्रल्हाद रायपुरे, कवडू उंदीरवाडे, जी. के. बारसिंगे, राहुल दुर्गे, प्रशील रामटेके, देवानंद मेश्राम, प्रफुल नागापुरे, सपना रामटेके, सीमा पोट्टाला, सुमित्रा राऊत, कांता ढवळे, रोशना शिंपी, प्रीती बांबोळे, अर्चना टेंभुर्णे, पुष्पा भनारकर, सुनंदा चौधरी, सुकेशनी करवाडे, मनीषा वाकडे, अंजली साखरे, सपना भैसारे आदी उपस्थित होत्या.
आरमोरी - भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा संघटक हंसराज बडोले यांच्या नेतृत्त्वात येथील तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक हंसराज बडोले, तालुकाध्यक्ष भीमराव ढवळे, केशव बांबोळे, रोहिदास बोदेले, सुरेश कांबळे, विनोद शेंडे, महादेव सहारे, प्रकाश मुलमुले, कुमता मेश्राम, लता बारसागडे, किरण बांबोळे, नीलेश मेश्राम, सूरज टेंभुर्णे, विश्वनाथ खोब्रागडे, प्रवीण रहाटे, श्रीरंग खोब्रागडे, धम्मानंद मेश्राम, लक्ष्मण जांभुळकर, जगदीश रामटेके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी, ओबीसी व विजेएनटी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट पूर्ववत ठेवावा, गरजू लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करावी, रोहयोची कामे सुरू करावी, शेतकºयांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, आरमोरी शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन वडसाचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी स्वीकारले.
चामोर्शी - भारिप बहुजन महासंघ शाखा चामोर्शीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांकडे निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक ग्राम पंचायत इतर बारा ग्राम पंचायतीमधील वंचित लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास, रमाई आवास व शबरी आवास योजनेंतर्गत तत्काळ घरकूल मंजूर करण्यात यावे. तालुक्यातील एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देताना भारिप बमसंचे चामोर्शी तालुकाध्यक्ष शैलेश बांबोळे, जिल्हा कार्याध्यक्ष पुनेश्वर दुधे, संघटक पुरूषोत्तम उंदीरवाडे, जिल्हा सल्लागार, प्रल्हाद दुबे, दिलीप वनकर, सिकदर चुनारकर, एन. पी. वाळके, एस. पी. उंदीरवाडे, कल्पना सहारे, राजर्श्री सहारे, प्रतिमा साखरे, बी. ए. सोरते, मनीषा बांबोळे, आशा मुळे, बेबीनंदा वनकर, प्रकाश राऊत, ज्योत्स्ना कावळे, सिद्धार्थ रायपुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान भारिप बमसंच्या पदाधिकाºयांनी विद्यमाने सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. केंद्र व राज्य सरकारने मागासवर्गीय लोकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देऊन न्याय दिला पाहिजे, असे भाषणात सांगितले. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून भारिपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारच्या सुमारास धडकले.

Web Title: Doctor of the office hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.