मंदिर टेकडी परिसराला हानी पोहोचवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:59 PM2017-12-17T23:59:48+5:302017-12-18T00:00:37+5:30

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नागपूर मंडळाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणाची रविवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सदर मंदिराच्या टेकडी परिसराला कोणतीही हानी पोहोचेल, अशी कृती करता येणार नाही.

Do not harm the temple hill | मंदिर टेकडी परिसराला हानी पोहोचवू नका

मंदिर टेकडी परिसराला हानी पोहोचवू नका

Next
ठळक मुद्देभंडारेश्वर मंदिराच्या कामाची पाहणी : पुरातत्व विभागाच्या मुख्य अभियंत्यांची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नागपूर मंडळाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणाची रविवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सदर मंदिराच्या टेकडी परिसराला कोणतीही हानी पोहोचेल, अशी कृती करता येणार नाही. तशी कृती करू नका अशा सूचना बांधकाम करणाºया अभियंत्यासह भंडारेश्वर मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
भंडारेश्वर मंदिराच्या परिसरात पुरातत्व विभागातर्फे संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे. याशिवाय हे मंदिर अधिक काळ सुरक्षित राहावा, या मंदिराच्या चबुतऱ्याची देखील डागडुजी सुरू आहे. मागील काही दिवसांपासून पावसाळ्यात मंदिराच्या कळसामधून गाभाऱ्यात पाणी गळत होते. याबाबतची सर्व दुरूस्ती करण्याचे निर्देश मुख्य अभियंता कॅम्पे गोंडा यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय टेकडी परिसरातील झाडेझुडूपे तोडणे, मंदिराची रंगरंगोटी व मंदिराच्या १०० मीटरच्या आत कोणालाही बांधकाम करता येणार नाही, अशी सूचना देखील भंडारेश्वर मंदिर समितीच्या पदाधिकाºयांना त्यांनी यावेळी केल्या. भारतीय पुरातत्व विभागाचे मुख्य अभियंता गौंडा यांच्यासह संरक्षक सहायक शाहीद अख्तर, वरिष्ठ अभियंता पी. डी. शिंदे, भंडारेश्वर समितीचे पदाधिकारी श्रावण नागोसे, महादेव दुमाने, बालाजी पोपळी आदी उपस्थित होते.
जीर्णोध्दार होणार
भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराच्या कामाची पाहणी केली. शिवाय या मंदिराच्या सौंदर्यीकरणाचे काम गतीने सुरू असल्याने लवकरच या मंदिराचा जीर्णोध्दार होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. भाविकांसाठी सुविधा करण्यात येणार आहे.

Web Title: Do not harm the temple hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर