वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:45 AM2019-01-14T01:45:35+5:302019-01-14T01:46:10+5:30

महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडचिरोली, आलापल्ली व देसाईगंज येथे ११ व १२ जानेवारी रोजी सभा घेण्यात आल्या.

Discussion on Funeral Issues | वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

Next
ठळक मुद्देराज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : गडचिरोली, आलापल्ली, देसाईगंज येथे सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडचिरोली, आलापल्ली व देसाईगंज येथे ११ व १२ जानेवारी रोजी सभा घेण्यात आल्या. या सभांमध्ये वनरक्षक व वनपाल यांच्या समस्यांवर चर्चा करून त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
सभेला महाराष्टÑ वनरक्षक-वनपाल संघटनेचे राज्य महासचिव इंद्रजीत बारस्कर, राज्य कोषाध्यक्ष शैलेंद्र भदाने, राज्य सचिव राजेश पिंपळकर, चंद्रशेखर तोंबर्लावार, नागपूर जिल्हाध्यक्ष संजय भेंडे, राज्य महिला आघाडी प्रमुख अर्चना नौकरकर, राज्य वन्यजीव विभाग प्रमुख विवेक येवतकर आदी उपस्थित होते.
सभेदरम्यान वनकर्मचाºयांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणे, सर्व वनकर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना, एकस्तर पदोन्नती लागू करणे, पोलीस विभागाप्रमाणेच वनविभागातही राखीव पदे निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणे, वनकर्मचारी विशेषत: दुर्गम भागातच कार्यरत राहतात. त्यांच्या पाल्यांना शहरी भागात शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शहराच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, दोन वर्षांचे बाळ असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची अवघड कामावर नियुक्ती न करणे, प्रत्येक कार्यालयात विशाखा कमिटी स्थापन करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली.
या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचेही ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अनिल झाडे तर आभार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी नितीन कुमरे, बाळू मडावी, चंदू सडमेक, श्रीनिवास धानोरकर, लक्ष्मण गंजीवार, राम तोकला, रवी जुआरे, हरीश दहागावकर, अजय इरकीवार यांनी सहकार्य केले. देसाईगंज येथील सभेला गाजी शेख, शिवा पवार, संजय पिलारे, गडचिरोलीच्या सभेला सिद्धार्थ मेश्राम, सुनील पेंदोरकर, राजू दुर्गे यांच्यासह वनरक्षक व वनपालांनी सहकार्य केले.

Web Title: Discussion on Funeral Issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.