अस्तित्वासाठी छत्तीसगडमधील दलमची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:20 AM2018-05-10T00:20:46+5:302018-05-10T00:20:46+5:30

नक्षलविरोधी अभियानात तीन आठवड्यांपूर्वी तब्बल ४० नक्षलवाद्यांना मारल्याने बिथरलेले नक्षलवादी सैरभैर झाले आहेत. अशात त्यांनी गुरूवार दि.१० रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.

With Dalam in Chhattisgarh for existence | अस्तित्वासाठी छत्तीसगडमधील दलमची साथ

अस्तित्वासाठी छत्तीसगडमधील दलमची साथ

Next
ठळक मुद्देपोलीस दल सतर्क : नक्षल्यांची आज गडचिरोली बंदची हाक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानात तीन आठवड्यांपूर्वी तब्बल ४० नक्षलवाद्यांना मारल्याने बिथरलेले नक्षलवादी सैरभैर झाले आहेत. अशात त्यांनी गुरूवार दि.१० रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. यादरम्यान आपले अस्तित्व दाखविण्यासाठी छत्तीसगडमधील काही नक्षल्यांना गडचिरोली जिल्ह्यात पाठविले जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात सध्याच्या घडीला मोजक्याच नक्षल्यांचे अस्तित्व आहे. सिरोंचा दलम जवळजवळ संपुष्टात आला आहे. भामरागडमधूनही नक्षल्यांना हद्दपार व्हावे लागत आहे. त्यातच नक्षल दलममध्ये जाण्यासाठी ग्रामीण भागातील युवक नकार देत आहेत.
परिणामी धानोरा, कोरची, एटापल्ली, अहेरी तालुक्यात विखुरलेल्या नक्षल्यांच्या दिमतीला आता छत्तीसगडमधील नक्षली येण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या लगत असलेल्या छत्तीसगडमधील जगदलपूर, बस्तर, राजनांदगाव जिल्ह्यात नक्षल्यांचे प्राबल्य आहे. गडचिरोली पोलिसांच्या कारवाईने नक्षल्यांना मोठा हादरा बसला असला तरी जिल्ह्याच्या जंगलातील आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी नक्षल्यांची धडपड सुरू आहे. नक्षली चकमकीत मारल्या गेलेल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांच्याकडून एखादा घातपात घडवून आणल्या जाण्याची शक्यता पाहता पोलिसांनीही आपली गस्त वाढविली आहे.
गुरूवारच्या बंददरम्यान सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विभाग सतर्क असून कोणत्याही अटीतटीच्या प्रसंगाशी तोंड देण्यासाठी पोलीस सज्ज आहेत.
सीआरपीएफकडून ६७० जवानांची भरती
नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५ कंपन्यांमध्ये ६७० जवानांची पदे रिक्त होती. ही पदे भरून काढण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सीआरपीएफकडून नवीन भरती करण्यात आली. यातील काही जवान प्रशिक्षणानंतर गडचिरोली जिल्ह्यात दाखलही झाले असून उर्वरित रिक्त पदेही भरली जाणार असल्याची माहिती सीआरपीएफचे महानिरीक्षक एन.राजकुमार यांनी दिली. ठिकठिकाणी पोलीस यंत्रणेचे जाळे तयार झाल्याने नक्षल चळवळ बॅकफूटवर गेली आहे.

Web Title: With Dalam in Chhattisgarh for existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.