कोरचीतील पेट्रोलपंपाला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:36 PM2018-06-25T22:36:25+5:302018-06-25T22:36:39+5:30

मागील अडीच महिन्यांपासून डेन्सीटी रेकार्ड मेंटेनन्स न केल्याच्या कारणावरून भारत पेट्रोलियमचे सेल्स आॅफीसर गोविंद जंगीर यांनी कोरची येथील पेट्रोलपंपाला अनिश्चित कालावधीसाठी सील ठोकले आहे.

Corrugated Petrol Pumps Seal | कोरचीतील पेट्रोलपंपाला सील

कोरचीतील पेट्रोलपंपाला सील

Next
ठळक मुद्देडिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार : डेन्सिटी रेकॉर्ड अद्यावत नसल्याने कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : मागील अडीच महिन्यांपासून डेन्सीटी रेकार्ड मेंटेनन्स न केल्याच्या कारणावरून भारत पेट्रोलियमचे सेल्स आॅफीसर गोविंद जंगीर यांनी कोरची येथील पेट्रोलपंपाला अनिश्चित कालावधीसाठी सील ठोकले आहे.
कोरची येथे रत्ना गेडाम यांच्या मालकीचे पेट्रोलपंप आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण पेट्रोल व डिझेल उपलब्ध व्हावे, यासाठी पेट्रोल व डिझेलची डेन्सीटीबाबतचा रेकार्ड ठेवणे पेट्रोलपंप चालकाला बंधनकारक आहे. मंगळवारी अचानक भारत पेट्रोलियम कंपनीचे सेल्स मॅनेजर गोविंद जंगीर यांनी तपासणी केली. तपासणीदरम्यान डेन्सीटी रेकार्ड मेंटेनन्स न केल्याचे दिसून आले. संबधित अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंपाला तत्काळ सील ठोकली. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेट्रोलपंपावरून पेट्रोल व डिझेलची विक्री केली जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. अधिकाºयांनी सील ठोकली असली तरी पेट्रोलपंपाची ग्राहकांमध्ये बदनामी होऊ नये, यासाठी पेट्रोलपंपासमोर काही तांत्रिक बिघाडामुळे पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले आहे, असे फलक लावले आहे. नमुन्यांचा निकाल दोन दिवसानंतर येईल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. मागील काही दिवसांपासून या पेट्रोलपंपावर कमी पेट्रोल दिले जात आहे, अशी तक्रार वाहनधारकांकडून केली जात आहे. या तक्रारीनुसारही पेट्रोलपंपाची चौकशी होणे आवश्यक आहे. तालुकाभरातील वाहनधारक याच पेट्रोलपंपावर डिझेल व पेट्रोल भरतात. खरीप हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने डिझेलची मागणी वाढली आहे. अशातच पेट्रोलपंपाला सील ठोकल्याने शेतीचा हंगाम अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Corrugated Petrol Pumps Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.