केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:19 AM2019-07-21T00:19:07+5:302019-07-21T00:19:38+5:30

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील १० आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी जात असताना त्यांना विश्रामगृहात स्थानबध्द करण्यात आले. या घटनेचे पडसाद गडचिरोलीत उमटले असून शनिवारी येथील इंदिरा गांधी चौकात सदर घटनेचा निषेध करण्यात आला.

Congress protest from the dictatorship of the central government | केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा काँग्रेसकडून निषेध

केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा काँग्रेसकडून निषेध

Next
ठळक मुद्देगडचिरोलीत निदर्शने । प्रियंका गांधींच्या स्थानबद्धतेचे पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील १० आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी जात असताना त्यांना विश्रामगृहात स्थानबध्द करण्यात आले. या घटनेचे पडसाद गडचिरोलीत उमटले असून शनिवारी येथील इंदिरा गांधी चौकात सदर घटनेचा निषेध करण्यात आला.
विद्यमान केंद्र सरकारच्या शासन काळात करण्यात आलेली ही कृती लोकशाहीविरोधी आहे, असा आरोप करीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या हुकूमशाही धोरणाचा निषेध केला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, रजनिकांत मोटघरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, युकाँचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, प्रथमेश चौधरी, सुनील डोगरा, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, शेखर आखाडे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Web Title: Congress protest from the dictatorship of the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.