काँग्रेसचे पदाधिकारी सायकलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:55 PM2018-01-31T23:55:09+5:302018-01-31T23:55:31+5:30

विद्यमान सरकारच्या एक वर्षाच्या काळात गॅसच्या किमतीत तब्बल १९ वेळा वाढ झाली. याशिवाय पेट्रोल व डिझेलचेही दर प्रचंड वाढले. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसला.

Congress office bearer cyclist | काँग्रेसचे पदाधिकारी सायकलवर

काँग्रेसचे पदाधिकारी सायकलवर

Next
ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध : वडेट्टीवार, उसेंडी यांनी केले मोर्चाचे नेतृत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यमान सरकारच्या एक वर्षाच्या काळात गॅसच्या किमतीत तब्बल १९ वेळा वाढ झाली. याशिवाय पेट्रोल व डिझेलचेही दर प्रचंड वाढले. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसला. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी सायकल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्त्व महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
पेट्रोल व डिझेल भाव दररोज वाढविले जात आहेत. पेट्रोल प्रती लीटर ८१ रूपयांवर गेलेला असून डिझेल ६५ रूपये प्रतीलीटरवर पोहोचले आहे. गॅस सिलिंडर ८१० रूपयांवर पोहोचला आहे. दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोल, डिझेलवर कर लावून भाजप सरकारकडून नागरिकांची लूट सुरू आहे, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.
या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, पांडुरंग घोटेकर, समशेर खॉ पठाण, शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर, पी.टी. मसराम, अतुल मल्लेलवार, नेताजी गावतुरे, एजाज शेख, रजनीकांत मोटघरे, बाबुराव बावणे, अमोल भडांगे, डी.डी. सोनटक्के, नितेश राठोड, राकेश रत्नावार, बालू मडावी, सुभाष धाईत, कुणाल पेंदोरकर, महादेव भोयर, लता ढोक, अपर्णा खेवले, नीलिमा राऊत, बाशिद शेख, पियूष मडावी, तौफिक शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.

Web Title: Congress office bearer cyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.