नुकसानग्रस्तांना भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:18 PM2018-07-22T22:18:09+5:302018-07-22T22:19:09+5:30

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील मेडीगड्डा प्रकल्पपीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकºयांनी तहसीलदारांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

Compensate the victims | नुकसानग्रस्तांना भरपाई द्या

नुकसानग्रस्तांना भरपाई द्या

googlenewsNext
ठळक मुद्देमेडीगड्डा प्रकल्पपीडित : शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील मेडीगड्डा प्रकल्पपीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी तहसीलदारांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
मेडीगड्डा प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेला रस्ता व एल अँड टी कंपनीकडून शेतीच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या सिमेंट प्लॉटमधून निघणाऱ्या धुरामुळे पिकांना हानी होत आहे. पोचमपल्लीतील शेतकऱ्यांची जवळपास ७० ते ८० एकर जमीन मेडीगड्डा प्रकल्पाशेजारी आहे. या प्रकल्पासाठी सामान वाहतूक करताना गावातूनच वाहने ने-आण कली जातात. याकरिता एल अँड टी प्रकल्पाकडून रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे व प्लाँमधून निघणाऱ्या धुरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उत्पादन होण्यापूर्वीच पिके नष्ट होत आहेत. धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पीडित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान जि. प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी प्रकल्पाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवेदन देताना रवींद्र सल्ला, रमेश सल्ला, मोरे राजाराम, सल्ला व्यंकन्ना, विजेंद्र सल्ला, श्रीनिवास सल्ला हजर होते.

Web Title: Compensate the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.