शेतकऱ्यांचा महावितरणच्या अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:28 PM2018-09-19T22:28:43+5:302018-09-19T22:29:53+5:30

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत.

Co-ordination of the farmers of MSEDCL | शेतकऱ्यांचा महावितरणच्या अभियंत्यांना घेराव

शेतकऱ्यांचा महावितरणच्या अभियंत्यांना घेराव

Next
ठळक मुद्देपाणीपुरवठ्यासाठी धडपड : सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. मात्र कुरखेडा तालुक्याच्या आंधळी व सावलखेडा भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज मोटारपंप जळाले. शिवाय पाणीपुरवठ्याच्या कामात अडचणी येत आहेत. महावितरणच्या वतीने कुठलेही भारनियमन न करता सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुरखेडा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना बुधवारी घेराव केला.
२४ तासाच्या आत आंधळी भागात व तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करावा, अन्यथा शिवसेना कुरखेडाच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकासह संतप्त शेतकºयांनी दिला आहे. कुरखेडाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख डॉ.महेंद्रकुमार मोहबंशी, तालुका प्रमुख आशिष काळे, कामगार सेना जिल्हा प्रमुख नरेंद्र तिरनकर, दशरथ लाडे, विजय पुस्तोडे, दिगांबर नाकाडे, लोमेश कोटांगले, मुजाहिद शेख, केशव भोडे, विठोबा लाकडे, रवींद्र कऱ्हाडे, आसाराम देवारे, रतिराम कºहाडे, विनायक जांभुळकर, तुलाराम टेंभूर्णे, भास्कर कुसाम, भारत जांभुळकर, लक्ष्मण कऱ्हाडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. या भागातील ७० टक्के लोकांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यंदाही शेकडो शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड केली आहे. धानपीक ऐन गर्भात असताना पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील आंधळी, नवरगाव, सोनेरांगी, कऱ्हाडी, सावलखेडा आदीसह लगतच्या गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महावितरणच्या वतीने कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.
विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज पंपही जळाले आहे. परिणामी पाण्याअभावी शेतकºयांचे धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Co-ordination of the farmers of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.