अधिकाऱ्यांवर दबावप्रकरणी दुग्धविकासमंत्री जानकर निर्दोष; न.प.निवडणुकीदरम्यानचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:40 AM2018-01-31T11:40:05+5:302018-01-31T11:40:21+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील तालुका न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांची मंगळवारी (दि.३०) निर्दोष मुक्तता केली आहे.

Clean chit to Mahadev Jankar ; Episode between Elections | अधिकाऱ्यांवर दबावप्रकरणी दुग्धविकासमंत्री जानकर निर्दोष; न.प.निवडणुकीदरम्यानचे प्रकरण

अधिकाऱ्यांवर दबावप्रकरणी दुग्धविकासमंत्री जानकर निर्दोष; न.प.निवडणुकीदरम्यानचे प्रकरण

googlenewsNext
ठळक मुद्देव्हिडिओ झाला होता व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील तालुका न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांची मंगळवारी (दि.३०) निर्दोष मुक्तता केली आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान विशिष्ट निवडणूक चिन्ह देण्यासाठी फोनवरून दबाव आणल्याच्या या प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. त्यानंतर जानकर व मोटवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या देसाईगंज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ना.महादेव जानकर यांनी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या घरून निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर नान्हे यांना फोन करून प्रभाग ९ ब मध्ये पंजा चिन्ह गोठवून ‘कपबशी’ हे चिन्ह द्यावे असे सांगितल्याचा व्हिडिओ गाजला होता.
याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेऊन दि.१० डिसेंबर २०१६ ला प्रभाग ९ ब ची निवडणूक रद्द ठरवून जानकर व मोटवानी यांच्याविरूद्ध भादंवि १६६ तसेच भादंवि १८६ कलमानुसार तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २२ (६) नुसार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जानकर यांनी तीन वेळा देसाईगंज न्यायालयात हजेरी लावली. २९ जानेवारीला अंतिम युक्तीवादादरम्यानही जानकर यांनी न्यायालयात न्यायाधीश के.आर. सिंघेल यांच्यासमोर हजेरी लावली. मंगळवारी सबळ पुराव्याअभावी महादेव जानकर आणि जेसा मोटवानी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अ‍ॅड.मनोज साबळे नागपूर व अ‍ॅड.मंगेश शेंडे देसाईगंज यांनी तर सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.फुले यांनी काम पाहिले.

Web Title: Clean chit to Mahadev Jankar ; Episode between Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.