जिल्हाभर बंदला नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 12:47am

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पहायला मिळाले. आंबेडकरी अनुयायांनी या प्रकरणाचा निषेध करीत सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पहायला मिळाले. आंबेडकरी अनुयायांनी या प्रकरणाचा निषेध करीत सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-कॉलेज आणि बसफेºयाही बंद राहिल्याने ९० टक्के व्यवहार ठप्प झाले होते. जिल्हाभरात कुठेही आंदोलनाने हिंसक वळण घेतले नाही. भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार गडचिरोली शहरात सकाळी ८ वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला. बुधवार हा गडचिरोली शहरात बुधवारी बाजारपेठ बंद राहात असली तरी काही तुरळक व्यापारी दुकाने उघडतात. मात्र मोर्चानंतर त्यांनीही दुकाने बंद ठेवत आंदोलनकर्त्यांना सहकार्य केले. गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात सकाळी ८.३० वाजतापासून निदर्शने सुरू झाली. या ठिकाणी झालेल्या निषेध सभेत काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ.विजय वडेट्टीवार, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रकाश ताकसांडे, प्रभाकर बारापात्रे, फहीम शेख, जगन जांभुळकर, संजय कोचे, भारिप-बहुजन महासंघाचे रोहिदास राऊत, तसेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. त्यांनी या घटनेचा निषेध करताना सरकारला चांगलेच धारेवर धरले. ११ वाजताच्या दरम्यान मोठ्या संख्येने जमलेल्या आंबेडकरी अनुयायांनी इंदिरा गांधी चौकात मानवी साखळी तयार करून काही वेळासाठी चारही बाजुंची वाहतूक रोखून धरली. यावेळी एसडीपीओ सागर कवडे, ठाणेदार संजय सांगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती हाताळली. दुपारी काही उत्साही युवक दुचाकींवरून फिरून रस्त्यालगत दुकान थाटून व्यवसाय करणाºया छोट्या दुकानदारांना बंदचे आवाहन करीत होते. कुरखेडा - कुरखेडा येथील बाजारपेठ बुधवारी पूर्ण दिवसभर बंद होती. युवकांनी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्व व्यापाºयांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद सरदारे, संतोष खोब्रागडे, जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे, माजी जि.प. सदस्य अशोक इंदुरकर, भीमराव दहिवते, पुनेश वालदे, प्रमोद खोब्रागडे, यादव सहारे, गुड्डू वालदे, दयाराम खोब्रागडे, बालक भानारकर, संतोष राऊत, मनोज बोदेले, संघमित्रा ढवळे, पंचशीला सहारे, सविता जांभुळकर, सिंधू राऊत, लक्ष्मण नंदेश्वर, अशोक अंबादे, बंडू लाडे, प्रकाश उईके यांच्यासह समता सैनिक दल, महासभा महिला मंडळ तळेगाव, पंचशील नवयुवक मंडळ तळेगाव आदी उपस्थित होते. कुरखेडा तालुकास्थळापासून तीन किमी अंतरावर असलेल्या तळेगाव येथील पंचशील नवयुवक मंडळ, महामाया महिला मंडळ व समस्त बौद्ध समाज मंडळाच्या वतीने भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दुकाने व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले. पलसगड-कुरखेडा मार्गावर टायर पेटवून एक तास वाहतूक थांबविली. या आंदोलनाने कुठेही हिंसक वळण घेतले नाही. सायंकाळी काही ठिकाणी व्यवहार सुरू झाले. शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल सकाळपाळीत शाळा असणाºया काही शाळांमध्ये नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते. मात्र १० वाजतानंतर आंदोलकांच्या आवाहनानुसार शाळांना सुटी देण्यात आली. दरम्यान नागपूर, चंद्रपूरसह बाहेरगावाहून बसगाड्या येत नसल्यामुळे सुरक्षेच्या कारणातून गडचिरोली आगारानेही सकाळी १० नंतर बाहेरगावी जाणाºया बसफेºया बंद केल्या. त्यामुळे बाहेरगावावरून गडचिरोलीत दररोज येणे-जाणे करणाºया शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. बसफेºया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत बराच वेळपर्यंत या विद्यार्थ्यांना बस स्थानकावर ताटकळत राहावे लागले. अशीच परिस्थिती काही तालुकास्थळीही होती. बसपाची वेगळी चूल विविध राजकीय पक्षांच्या वतीने सकाळी इंदिरा गांधी चौकात धरणे व निषेध सभा झाली. हे आंदोलनकर्ते तेथून गेल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याच चौकात जमून सरकारविरोधी निदर्शने केली. काही वेळासाठी त्यांनी रास्ता रोकोही केला. त्यानंतर राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन भीमा कोरेगावच्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष वामन राऊत, जिल्हा प्रभारी रमेश मडावी, प्रशांत दोनाडकर, ज्योती सोमनकर, कृष्णा वाघाडे, तुलराम दुधे, केशवराव सामृतवार, अरविंद गजभिये आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित

नागपूर मेट्रोरिजन मधील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईला स्थगिती
भारनियमनाच्या वेळेत बदल
अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’
संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार
शहरवासीयांची तहान भागविणार पुजारीटोला

गडचिरोली कडून आणखी

नागपूर मेट्रोरिजन मधील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईला स्थगिती
भारनियमनाच्या वेळेत बदल
अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’
संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार
शहरवासीयांची तहान भागविणार पुजारीटोला

आणखी वाचा