मुख्य वनसंरक्षक पोहोचले आलापल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:46 AM2018-05-20T00:46:32+5:302018-05-20T00:46:32+5:30

१६ मे रोजी आलापल्ली व परिसराला जोरदार वादळाचा तडाखा बसला होता. वादळी पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर, टिन उडून गेले होते. सर्वात जास्त नुकसान आलापल्ली येथील वन विभगाच्या वसाहतीतिल कर्मचाºयांच्या निवासस्थानाचे झाले होते.

The Chief Conservator has reached | मुख्य वनसंरक्षक पोहोचले आलापल्लीत

मुख्य वनसंरक्षक पोहोचले आलापल्लीत

Next
ठळक मुद्देमदत देण्याच्या सूचना : वादळाने क्षतिग्रस्त झालेल्या कर्मचारी वसाहतीची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : १६ मे रोजी आलापल्ली व परिसराला जोरदार वादळाचा तडाखा बसला होता. वादळी पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर, टिन उडून गेले होते. सर्वात जास्त नुकसान आलापल्ली येथील वन विभगाच्या वसाहतीतिल कर्मचाºयांच्या निवासस्थानाचे झाले होते. शुक्रवारी मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. येटबॉन यांनी प्रत्यक्ष आलापल्लीत येऊन नुकसानग्रस्त वसाहत कर्मचारी निवासस्थानाची पाहणी केली.
यावेळी आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल, सहायक उपवनसंरक्षक एच.जी. मडावी, आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील आदी उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांनी स्वत: नुक्सानग्रस्त भागाची पाहणी करून पीडितांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना संबंधिताना केल्या. यात जवळपास ४० हुन अधिक कर्मचारी निवासस्थान तसेच कार्यालये आणि सुप्रसिद्ध वन विश्राम गृहाचा समावेश आहे.
मागील तीन वर्षांत चार वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या. मागणी नसतानाही कवेलू काढून टीन पत्रे टाकण्यात आले. तेव्हापासूनच असे प्रकार घडत असल्याचे महिलांनी मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांच्या लक्षात आणून दिले. सदर निवासस्थानाची चांगल्याप्रकारे दुरुस्ती करा व यापुढे अशा घटना घडू नये याची खबरदारी घ्या, अशा सूचना मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांनी यावेळी दिल्या. नैसर्गिक कोप झाल्यानंतर मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांनी थेट आलापल्ली येथे येऊन नुकसानीची तत्काळ पाहणी केल्यामुळे कर्मचाºयांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.

Web Title: The Chief Conservator has reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.