चव्हेला पुनर्वसनाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:28 AM2018-04-21T01:28:46+5:302018-04-21T01:29:52+5:30

आरमोरी तालुक्याच्या मानापूर/देलनवाडी परिसरातील कोसरी सिंचन प्रकल्प रखडला होता. मोबदला कधी मिळणार, कोठरी प्रकल्पाचे पाणी कधी मिळणार, अशा अनेक प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Chavala is completely redressed | चव्हेला पुनर्वसनाचा तिढा सुटला

चव्हेला पुनर्वसनाचा तिढा सुटला

googlenewsNext
ठळक मुद्देसिंचन प्रकल्पाचा मार्ग मोकळा : पाणी योजना व घरांचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मानापूर/देलनवाडी परिसरातील कोसरी सिंचन प्रकल्प रखडला होता. मोबदला कधी मिळणार, कोठरी प्रकल्पाचे पाणी कधी मिळणार, अशा अनेक प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कोसरी सिंचन प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे या भागातील शेती सुजलाम, सुफलाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी २३ वर्षांपूर्वी कोसरी (चव्हेला) हा लघु सिंचन प्रकल्प मंजूर केला होता. सदर प्रकल्पाचे नियोजनही पूर्ण झाले होते. मात्र सन १९८० च्या वनकायद्यामुळे हा प्रकल्प व पुनर्वसनाचे काम रखडले होते. तत्कालीन जलसंपदा मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या काळात हा प्रकल्प मंजूर झाला होता. कोसरी लघु पाटबंधारे योजनेमुळे बाधित होणाऱ्या वनक्षेत्राच्या मोबदल्यात वनविभागाकडे ८०२ लाख रूपये इतकी एनपीव्हीची रक्कम भरण्यात आली होती. सदर योजनेमुळे या भागातील ७७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र पुनर्वसनाच्या सबबीखाली हा सिंचन प्रकल्प रखडला होता. पुणे, मुंबईच्या धर्तीवर ज्या प्रमाणात मोबदला दिला जातो, त्याच प्रमाणात आम्हाला जवळपास ८ ते १० लाख रूपये मोबदला देण्यात यावा, अशी मागणी या भागातील बाधित नागरिकांनी केली होती.
२०११ मध्ये प्रत्यक्ष या प्रकल्पाचे सुरू करून हे काम ९० टक्क्यांवर पोहोचविण्यात आले. केवळ गेट बसविण्याचे काम शिल्लक राहिले आहे. आता सर्व प्रश्नांचे निराकरण होऊन जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मोबदला म्हणून भराची रक्कम बाधित नागरिकांच्या खात्यात येत्या एक-दोन दिवसात जमा होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गेटचे काम सुरू होऊन सदर प्रकल्प १०० टक्के पूर्ण होईल. यातून सिंचन व्यवस्था निर्माण होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
ही कामे प्रगतीपथावर
वसाहतीसाठी मानापूर-अंगारा रस्त्याजवळ कोसरीलगत वसाहत निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाण्याची टाकी उभारण्यात आली असून येथे अंगणवाडी सार्वजनिक सभागृह व नाली तसेच रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

Web Title: Chavala is completely redressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.