फसवणूक प्रकरणात बडे मासे मोकळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:05 AM2019-07-14T00:05:06+5:302019-07-14T00:06:41+5:30

कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंज शहर व परिसरातील हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविण्याच्या प्रकणातील गूढ अजूनही उकललेले नाही. प्रकरणातील बडे मासे अजूनही मोकळे फिरत असल्यामुळे पाणी कुठे मुरतेय का? कारवाईसंदर्भात राजकीय दबाव आहे का? अशा विविध चर्चांना पेव फुटत आहे.

In the case of cheating, big fish will be free | फसवणूक प्रकरणात बडे मासे मोकळेच

फसवणूक प्रकरणात बडे मासे मोकळेच

Next
ठळक मुद्देअडकलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंज शहर व परिसरातील हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविण्याच्या प्रकणातील गूढ अजूनही उकललेले नाही. प्रकरणातील बडे मासे अजूनही मोकळे फिरत असल्यामुळे पाणी कुठे मुरतेय का? कारवाईसंदर्भात राजकीय दबाव आहे का? अशा विविध चर्चांना पेव फुटत आहे.
या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून असलेल्या शिफा उर्फ शबाना राजमोहम्मद चौधरी व तिचा भाचा निसार अहमद रोजनअली चौधरी या दोघांना अटक झाल्यानंतर प्रकरणातील बडे मासे आता समोर येतील अशी चर्चा होती. पोलिसांनी त्यादृष्टीने कारवाईही सुरू केली होती. पण कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. वास्तविक शिफा व तिच्या भाच्याने या प्रकरणात जमवलेला पैसा कोणाकडे दिला, त्याची विल्हेवाट कशी लावली, कोणाच्या खात्यावर गेली वगैरे माहिती दिल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी संबंधित लोकांना अटक करून पोलिसी हिसका दाखविल्यास ते पोपटासारखे बोलतील, परंतू पोलिसांच्या कारवाईत कोणीतरी आडवे येत असल्यानेच कारवाईस करण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा देसाईगंजमध्ये रंगत आहे.
कोट्यवधी रुपयांच्या या प्रकरणात ज्यांनी पैसा गुंतवला आहे त्यांचा जीव अजूनही टांगणीला लागला आहे. खऱ्या म्होरक्यांना लवकर अटक करा आणि आमचा कष्टाचा पैसा आम्हाला परत करा, अशी गळ घालत गुंतवणूकदार पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. काहींनी या प्रकरणी तातडीने चौकशी पूर्ण करून पैसा वसूल करण्यासंबंधी पालकमंत्र्यांकडे शुक्रवारी तक्रार केली.
दरम्यान पोलिसांनी दोन वेळा घेतलेला पीसीआर संपल्यानंतर शिफा व या तिच्या भाच्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

Web Title: In the case of cheating, big fish will be free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.