कचऱ्यासह लाकूड जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:05 AM2018-06-02T01:05:00+5:302018-06-02T01:05:00+5:30

आलापल्ली वन परिक्षेत्रात कुपकटाईचे काम सुरू असून या ठिकाणी कचºयासोबत बिटाच्या साईजचे लाकडे सुध्दा जाळली जात आहेत. सदर प्रकार आलापल्ली वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४२ मध्ये उघडकीस आला असून अशा प्रकारामुळे वन विभागाचे मोठे नुकसान होत आहे.

Burned wood with garbage | कचऱ्यासह लाकूड जळाले

कचऱ्यासह लाकूड जळाले

Next
ठळक मुद्देवन विभागाचे नुकसान : कक्ष क्रमांक ४२ मधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली वन परिक्षेत्रात कुपकटाईचे काम सुरू असून या ठिकाणी कचºयासोबत बिटाच्या साईजचे लाकडे सुध्दा जाळली जात आहेत. सदर प्रकार आलापल्ली वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४२ मध्ये उघडकीस आला असून अशा प्रकारामुळे वन विभागाचे मोठे नुकसान होत आहे.
कक्ष क्रमांक ४२ मध्ये टीपीडब्ल्यूसी अंतर्गत कूप कटाईचे काम सुरू आहे. या कामादरम्यान उपयोगात येणारी लाकडे वगळता जागा स्वच्छ करण्यासाठी उर्वरित छोट्या फांद्या व कचरा जाळण्यात येतो. मात्र कक्ष क्रमांक ४२ मध्ये उर्वरित फांद्या व कचऱ्यासोबत लाकडे सुध्दा जाळण्यात आली आहे. बिट म्हणून ज्याचा उपयोग होऊ शकतो, अशी मोठी लाकडे सुध्दा या आगीत जळून खाक झाली आहे. सबंधित वनरक्षकाच्या दुर्लक्षितपणामुळे कक्ष क्रमांक ४२ मध्ये मोठी लाकडे जळून नष्ट झाली आहे. कचरा जाळताना खबरदारी बाळगल्यास सदर बिट विक्री करून यातून वन विभागाला महसूल प्राप्त झाला असता, तसेच जंगलात पडून असलेले लाकडे ग्रामस्थ सरपण म्हणून उपयोगात आणू शकत होते. मात्र कक्ष क्रमांक ४२ मध्ये कचºयासोबत लाकडे जाळण्यात आल्याने वन विभाग व ग्रामस्थांचाही काही फायदा झाला नाही. सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित कार्यक्षेत्रातील वनरक्षकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

तक्रार प्राप्त झाली असली तरी व्यस्ततेमुळे मी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करू शकलो नाही. कर्तव्यात मी प्रामाणिक असून प्रत्यक्षात पाहणी केल्यावर दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल.
- रवी अग्रवाल, उपविभागीय वनाधिकारी, आलापल्ली

Web Title: Burned wood with garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग